रशिया आक्रमक; भारताने कीवमधील दुतावास तातडीनं केला बंद

रशियाने (Russia) युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव या शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Embassy of India in Ukraine
Embassy of India in UkraineSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव या शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय दुतावासाने (Indian Embassy) मंगळवारी सर्व भारतीयांना तातडीने कीव (Kyiv) सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रात्री कीवमधील दुतावासही बंद करण्यात आल्याचे समजते. पण अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी कीव व खारकीव (Kharkiv) या शहरांमध्ये अडकले आहेत.

भारतीय दुतावासाने कीवमध्ये अडकलेल्यांना युक्रेनच्या (Ukraine) पश्चिमेकडील सीमेकडे जाण्यास सांगितले आहे. कीव व खारकीवमधील स्थिती दिवसेंदिवस अधिकच असुरक्षित होत चालली आहे. कीवमध्ये एकही भारतीय सोडणार नाही, असं सांगत दुतावासाकडून कार्यालय बंद करण्यात आले आहे. आता हे कार्यालय पश्चिम भागातील लवीव शहरात हलवल्याचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. बुधवारी कीवमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन सैन्याकडून हल्ला करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. (Russia Ukraine War)

Embassy of India in Ukraine
बारावीला ९७ टक्के गुण मिळाले तरी युक्रेनला जावं लागलं! नवीनच्या वडिलांचा आक्रोश

मंगळवारी खारकीव शहरात झालेल्या हल्ल्यात नवीन शंकरप्पा (Naveen Shankarappa) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतीय दुतावास अत्यंत सतर्क झाला असून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत. रशियन सैन्याने खारकीवमधील स्थानिक सरकारी कार्यालयांवर हल्ला चढवला आहे. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच कीवमधील टेलिव्हिजन टॉवर उडवण्यात आला असून या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील टेलिव्हिजन सेवाही विस्कळित झाली आहे. युक्रेनमधून आतापर्यंत सुमारे सात लाख नागरिक अन्य देशांत गेले आहेत.

खासकीवमधील बॉम्बहल्ल्यात मागील चोवीस तासात २१ जणांचा मृत्यू झाला असून ११२ जण जखमी झाले आहेत, असी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संघाच्या संसदेत रशियाच्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत युक्रेनला संघाचे सदस्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

Embassy of India in Ukraine
सुपर मार्केटबाहेर रांगेत उभा असतानाच भारतीय विद्यार्थ्यावर काळ कोसळला!

रशियाच्या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये रशियावर निर्बंध लादले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही रशियाला हल्ले थांबविण्याचे आवाहन केले आहे. पण त्यानंतरही रशियाचे हल्ले सुरूच आहेत. युक्रेनने शस्त्र खाली ठेवल्याशिवाय हल्ले थांबणार नाहीत, असं रशियाने स्पष्ट केलं आहे. तर युक्रेनही मागे हटण्यास तयार नाही. चर्चा सुरू असताना रशियाने हल्ले थांबवावेत, अशी ठाम भूमिका युक्रेननं घेतली आहे. आज दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com