उजव्या विचारांना नाकारलं! फ्रान्समध्ये पुन्हा एकदा 'मॅक्रॉन'पर्व

सलग दुसऱ्यांदा मॅक्रॉन यांना मिळाली सत्ता
Emmanuel Macron France
Emmanuel Macron France Sarkarnama
Published on
Updated on

पॅरिस : फ्रान्सच्या (France) अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष (President) इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. मॅक्रॉन यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन (Marine Le Pen) यांचा पराभव केला आहे. फ्रान्समधील जनतेने उजव्या विचारांना नाकारले आहे. सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणारे मॅक्रॉन हे मागील वीस वर्षातील पहिलेच नेते आहे. (France Presidential Election Updates)

फ्रान्सची अध्यक्षीय निवडणूक दोन टप्प्यांमध्ये झाली. या निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.55 टक्के तर पेन यांना 41.45 टक्के मते मिळाली. फ्रान्समध्ये उजव्या विचारसरणीच्या नेत्याचा पराभव झाला आहे. असे असले तरी पेन यांच्याएवढी मते आतापर्यंत उजव्या विचारसरणीच्या नेत्याला कधीही मिळाली नव्हती. नॅशनल रॅली पक्षाच्या मरीन पेन यांनी हा पराभव म्हणजे आपला विजयच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या अध्यक्षीय निवडणुकीत 72 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. 1969 च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एवढे कमी मतदान झाले. सुमारे एक तृतीयांश मतदारांनी मतदानच केले नाही. अनेक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता मतपेटीत कोरीच मतपत्रिका टाकली.

Emmanuel Macron France
जिग्नेश मेवानी आसामच्या तुरुंगात अडकताच भाजपनं त्यांच्याच मतदारसंघात टाकला डाव

मॅक्रॉन यांचा विजय जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आयफेल टॉवर परिसरात जल्लोष केला. विजयानंतर आनंद व्यक्त करताना मॅक्रॉन यांना फ्रान्सला अधिक मजबूत करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले. मला मत न करणाऱ्यांच्या रागाचे आणि नाराजी कारण शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. रागाला प्रेमानेच उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले आहे.

Emmanuel Macron France
चंद्रकांत पाटलांचा दे धक्का! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

युरोपीय देशांना दिलासा

उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन या रशियाच्या समर्थक मानल्या जातात. तसेच, स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण, मुस्लिम महिलांनी बुरखा अथवा हिजाब घालण्यास मनाई याबाबत त्यांची टोकाची मते आहेत. मॅक्रॉन यांचा रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला विरोध आहे. फ्रान्स युरोपमधील मोठी अर्थव्यवस्था आहे. रशियावर निर्बंध लागू करण्याचे पाऊलही फ्रान्सने आधीच उचललं आहे. त्यामुळे रशियाच्या समर्थक असलेल्या पेन यांच्या पराभवामुळे युरोपीय देशांना दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com