जिग्नेश मेवानी आसामच्या तुरुंगात अडकताच भाजपनं त्यांच्याच मतदारसंघात टाकला डाव

जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून पुन्हा अटक
Manilal Vaghela joins BJP
Manilal Vaghela joins BJP Sarkarnama
Published on
Updated on

सुरत : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांना जामीन मिळताच लगेचच आसाम पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली आहे. यामुळं राजकारण तापलं आहे. यातच आता भाजपने (BJP) मेवानींसह काँग्रेसला धक्का दिला आहे. मेवानी यांच्या मतदारसंघातील काँग्रेस नेत्याला भाजपने फोडले आहे. या नेत्याला भाजपकडून मेवानींच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत माजी आमदार मणिलाल वाघेला (Manilal Vaghela) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मेवानी यांच्यामुळं काँग्रेसनं वाघेलांना मागील वेळी वडगाव मतदारसंघातून तिकीट नाकारलं होतं. आता वाघेला यांना मेवानी यांच्या विरोधातच मैदानात उतरवण्याचा डाव भाजपने टाकला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्याची खेळी भाजपने खेळली आहे.

Manilal Vaghela joins BJP
चंद्रकांत पाटलांचा दे धक्का! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव शहरात झालेल्या विजय विश्वास संमेलनात मणिलाल वाघेला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. वाघेला यांनी 2012 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर वडगावमधून विजय मिळवला होता. नंतर 2017 मध्ये त्यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं होतं. काँग्रेसनं त्यावेळी अपक्ष उमेदवार आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांना समर्थन दिले होते. त्यावेळी मेवानी यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला होता.

Manilal Vaghela joins BJP
राजकारण तापलं! आमदार जिग्नेश मेवानींना जामीन अन् लगेचच पुन्हा अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्विट केल्याबद्दल मेवानी यांच्यावर आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना या प्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयानं मेवानी यांना आज जामीन मंजूर केला. यानंतर लगेचच दुसऱ्या गुन्ह्यात मेवानींना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com