
ANSCB Fraud Case : अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ED ने आजवर देशभरात विविध घोटाळ्यांच्या तपासासाठी छापेमारी केली. हजारोंना अटक केली. काही तुरूंगवास झाला तर काही जण सुटले. अजूनही हजारो प्रकरणे कोर्टात प्रलंबित असून शेकडो प्रकरणांचा तपास सुरू आहे. पण आजपर्यंतच्या ईडीच्या इतिहासात कधीही अंदमान आणि निकोबार बेटांवर छापेमारी करण्यात आलेली नव्हती.
ईडीने गुरूवारी पहिल्यांदाच राज्य सहकाही बँकेच्या घोटाळाप्रकरणाच्या तपासासाठी अंदमानमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक रेड ठरली आहे. अंदमान निकोबार राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यासाठी नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याचप्रकरणात कोलकातामध्ये दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
अंदमान निकोबार पोलिसांनी याप्रकरणी बँकेचे अधिकारी आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याआधारे ईडीने या तपासात उडी घेत छापेमारी केली आहे. छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे लागली आहे. त्यानुसार बँकेने दिलेली कर्जे आणि ओव्हरड्राफ्टमध्ये अनियमितता आढळून आली आहे. शेल कपन्यांना नियम डावलून कर्जवाटप करण्यात आल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आले आहे.
अंदमान आणि निकोबारचे माजी खासदार कुलदीप राय शर्मा यांच्या फायद्यासाठी 15 कंपन्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
बँकेने दिलेल्या कर्जातील मोठी रक्कम रोखीने शर्मा यांच्यासह इतर लाभार्थ्यांना देण्यात आल्याचाही आरोप आहे. माजी खासदार शर्मा हे अंदमान निकोबार राज्य सरकारी बँकेचे अध्यक्ष होते. शर्मा यांना याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अंदमान निकोबार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले होते. ते काँग्रेसचे नेते आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.