PM Modi On The Kerala Story: कर्नाटक प्रचारात 'केरळा स्टोरी'ची एन्ट्री; दहशतवादी कटाचा खुलासा केल्याचा मोदींचा दावा!

Karnataka Election - PM Narendra Modi On The Kerala Story : "केरळमधील दहशतवादी कारस्थान या चित्रपटातून मांडले गेले असल्याचा दावा.."
PM Narendra Modi On The Kerala Story
PM Narendra Modi On The Kerala StoryPM Narendra Modi On The kerala Story :

Karnataka Assembly Election Campaign: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बेल्लारी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. (Latest Marathi News)

PM Narendra Modi On The Kerala Story
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

पंतप्रधान मोदी म्हणाले, "अशा दहशतवादी कट कारस्थानावर आधारित बनवलेल्या 'केरळ स्टोरी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. द केरळ स्टोरी' एका राज्यातील दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. केरळ हा देशातला इतकं सुंदर राज्य, जिथे लोक खूप मेहनती आणि प्रतिभाशाली आहेत, तिथे सुरू असलेला दहशतवादी कारस्थान या चित्रपटातून मांडले गेले आहे. "

PM Narendra Modi On The Kerala Story
Sanjay Raut on ED Arrest : 'ईडी'ने अटक करायच्या आदल्या दिवशी...; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदी म्हणाले, "बॉम्ब-बंदुका आणि पिस्तुलांचे आवाज ऐकू येतात, मात्र आपल्याच समाजाला आतून पोखरणाऱ्या दहशतवादी कारस्थानाचा आवाज येत नाही. न्यायालयानेही या दहशतवादी कारस्थानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "देशाचे दुर्दैव बघा की. आज काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करण्याऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी उभी दिसत आहे. एवढेच नाही तर अशा दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी काँग्रेस मागच्या दाराने राजकीय सौदेबाजी करत आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसला असे करताना पाहून मला आश्चर्य वाटते."

"कर्नाटकला देशातील नंबर एकचं राज्य बनवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वात महत्त्वाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिला आहे. मात्र जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखते," असेही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi On The Kerala Story
Amol Kolhe On Sharad Pawar Retirement : 'अध्यक्षपद सोडण्यामागील शरद पवारांच्या भावनाही समजून घेणे महत्वाचे!'

केरळ स्टोरी रिलीज :

'द केरळ स्टोरी' आज देशभरात प्रदर्शित झाली. या चित्रपटावरून वाद सुरू आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. केरळ उच्च न्यायालयाने 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com