Uma Bharati Narendra Modi Amit Shah
Uma Bharati Narendra Modi Amit ShahSarkarnama

Women Reservation Bill : निवडणुकीपूर्वीच खासदार भारतींनी वाढवल्या भाजपच्या अडचणी; 'महिला विधेयकात ओबीसींना स्थान...'

Uma Bharti on Women Reservation Bill : उमा भारतींनी मोदी सरकारवर उपस्थित केले सवाल...
Published on

Madhya Pradesh News : महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकारचे सर्वात मोठे बलस्थान म्हणून मतदारांपुढे हा भाजप सादर करू शकतो. येत्या निवडणुकीतही याचा भाजपला फायदा होणार, असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. मात्र, भाजपच्याच प्रमुख महिला नेत्या आणि खासदार उमा भारती यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे. महिला विधेयकावर त्या पूर्णपणे समाधानी नसून, त्यांनी याबाबत काही मागण्या केल्या आहेत . (Latest Marathi News)

Uma Bharati Narendra Modi Amit Shah
Rahul Gandhi PC : महिला आरक्षण विधेयकात दोन चुका; राहुल गांधींनी वेधले लक्ष

माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि आता खासदार असलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्या उमा भारती यांनी महिला आरक्षण विधेयकावर (नारी शक्ती वंदन कायदा) प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यात मुख्यत्वे ओबीसी महिलांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. उमा भारती म्हणाल्या, "मला पक्षाला कमकुवत करायचे नाही, पण महिलांसाठी ओबीसी आरक्षण मिळवून दाखवणार आहे."

एकीकडे महिला आरक्षण विधेयकाला एमआयएम हा पक्ष वगळता सर्वच पक्षांची मान्यता दिली, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या उमा भारती यांनी विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामुळे तोंडावर असलेल्या मध्य प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी करताना भाजपची इथे कोंडी होऊ शकते.

ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काय म्हणाले?

यापूर्वी भाजप खासदार उमा भारती यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षणासह तिकीट देण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केले होते. कायदा लागू झाल्यानंतर यावर काहीतरी केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Uma Bharati Narendra Modi Amit Shah
Rahul Gandhi On Women Reservation : काँग्रेसच्या महिला विधेयकात OBC आरक्षण नव्हतं, याचा खेद वाटतो का ? राहुल गांधी म्हणाले...

केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडले होते, ज्याला लोकसभेत फक्त दोन खासदारांनी विरोध केला होता, तर राज्यसभेत ते एकमताने बिनविरोध मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्षात महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी कधी होईल, याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाखडी होत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com