पाच राज्यांच्या निकालाआधीच राहुल गांधींनी आईस्क्रिम खाऊन घेतली

Rahul Gandhi| Congress| या सर्व गोंधळात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागले आहेत. पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यातील निवडणूकांचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाला (BJP) घवघवीत यश मिळाले आहे. विविध संघटनानी केलेल्या एक्सिट पोलनुसार पंजाब वगळता चार राज्यात भाजपने मोठे यश मिळवले आहे. तर पंजाबमध्ये कॉंग्रेसवर (Congress) आणि भाजपला धुळ चारत आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) भगवंत सिंह मान यांनी बाजी मारली आहे.

या सर्व गोंधळात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या इस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यात ते आइस्क्रिम खाताना दिसत आहेत. निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवार (९ मार्च) चा हा फोटो आहे. निकालाच्या पूर्व संध्येला हा फोटो त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांना भावी पंतप्रधान म्हणून प्रोत्साहन दिले आहे तर काहींनी त्यांना ट्रोलही केले आहे. २४ तासात त्यांच्या या फोटोवर दोन लाखाहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

Rahul Gandhi
Live Election Result : फडणवीसांच्या जंगी स्वागताची भाजपची तयारी..

राहुल गांधी आज वायनाडमध्ये होते. निकाल लागल्यानंतर सायंकाळपर्यंत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र नुकतीच राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण पराभव स्विकारल्याचे मान्य केले आहे, ''आम्ही जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारत आहोत. निवडणूकीत जनादेश जिंकणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू.'' असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

पाच राज्यांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, पंजाबमध्ये भाजपला २ आम आदमी पक्षाला ९२ आणि कॉंग्रेसला सुमारे १८ जागा मिळाल्या आहेत. तर उत्तरप्रदेशात भाजपला २५४, तर कॉंग्रेसला केवळ २ चा जागा मिळाल्या आहेत. गोव्यात भाजपला २० तर कॉंग्रेसला ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मणिपूरमध्येही भाजपला २९ आणि कॉंग्रेसला ४ जागा मिळाल्या आहेत. तर उत्तराखंडमध्ये भाजपला ४९ जागा मिळाल्या असून कॉंग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com