EVM Hacking Claims : EVM हॅक करून निकाल बदलणे शक्य? ; अमेरिकन इंटेलिजन्सच्या दावा, तर भारतानेही दिले स्पष्टच उत्तर, म्हटलं..

Tulsi Gabbard Raises Concerns Over EVM Hacking : जाणून घ्या, तुलसी गबार्ड यांनी केलेल्या दाव्यावर भारताच्या मुख्य निवडणू आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काय म्हटलं आहे?
Tulsi Gabbard addressing EVM hacking concerns; India’s Election Commissioner Dyanesh Kumar firmly denies allegations of tampering in India’s voting system.
Tulsi Gabbard addressing EVM hacking concerns; India’s Election Commissioner Dyanesh Kumar firmly denies allegations of tampering in India’s voting system. sarkarnama
Published on
Updated on

India Election Commission : अमेरिकी राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी EVMमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा केला होता. ज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी खंडण केले आणि शनिवारी सांगितले की, EVM पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्यासोबत कोणतीही छेडछाड केली जात नाही.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, जिथेही लोकशाही अस्तित्वात आहे, तिथे मतदार यादी आणि निवडणक प्रक्रिया वेगवेगळी आहे आणि काही देशांमध्ये EVMचा वापर केला जातो. कुमार यांनी म्हटले की, भारतात पीएसयूद्वारे बनवली गेलेल्या EVMचा वापर केला गेला आणि या मशीन्सची कायदेशीर तपासणी केली गेली आहे आणि भारताच्या EVMला ब्लूटूथ इंफ्रारेडने नाही जोडता येत. त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करणे शक्य नाही.

Tulsi Gabbard addressing EVM hacking concerns; India’s Election Commissioner Dyanesh Kumar firmly denies allegations of tampering in India’s voting system.
MSRTC salary issue : 'एसटी' कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गोंधळ; पण नेते कुठे झाले गायब?

याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, EVM छेडछाडीपासून सुरक्षित आहे, पाच कोटी व्हीव्हीपॅट स्लीप मोजण्यात आल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या गडबडीची माहिती मिळालेली नाही. तसेच त्यांनी पुढे सांगितले की आम्ही भारतीय नागरिकांना खात्री देऊ इच्छितो की EVM पूर्णपणे सुरक्षित आहे.

Tulsi Gabbard addressing EVM hacking concerns; India’s Election Commissioner Dyanesh Kumar firmly denies allegations of tampering in India’s voting system.
EVM Hacking Global Reaction : 'EVM' हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल, तो म्हणजे, ईलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. विशेष करून काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही. आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे.

Tulsi Gabbard addressing EVM hacking concerns; India’s Election Commissioner Dyanesh Kumar firmly denies allegations of tampering in India’s voting system.
Top Ten News : नाशिकचे जिल्हा न्यायाधीश आर.आर. राठींवर कारवाई ; बागल गटाच्या हाती ‘आदिनाथ’च्या सत्तेची चावी! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com