EVM Hacking Global Reaction : 'EVM' हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

US Intelligence Director Tulsi Gabbard electronic voting machine hacking Donald Trump international response : अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो, असा दावा केला आहे.
EVM Machine
EVM MachineSarkarnama
Published on
Updated on

US Intelligence on EVM Hack : देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल, तो म्हणजे, ईलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले.

विशेष करून काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही. आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारतातील विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम (EVM) मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित तुलसी गबार्ड यांनी मत व्यक्त केल्याने ईव्हीएमच्या विश्वासर्हतेविषयी पुन्हा जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

EVM Machine
Suresh Dhas Dhananjay Munde meeting : 'होय, गेलो होतो धनंजय मुंडेंना भेटायला'; आमदार धस म्हणाले, 'तरीही देशमुख कुटुंबिय अन् मस्साजोग गावकरी...'

तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर (Social media) वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्राॅनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.

EVM Machine
BJP AIADMK Alliance Tamil Nadu : मोठी बातमी! तामिळनाडूत आता BJP-AIADMK युती ; अमित शहांनी केली घोषणा अन् म्हणाले...

भारतीय निवडणूक आयोगाचा दावा

अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्याचे पडसाद भारतात देखील उमटू लागले आहेत. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटवरील मतांशी जुळणी झाली आहे. ईव्हीएम मतांशी जुळत आहे. हा ईव्हीएमबाबतच्या विश्वासर्हतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. भारतातील ईव्हीएम आणि इतर देशातील ईव्हीएम मशीन सिस्टम वेगळ्या आहेत, असा दावा देखील भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे.

भारतातील ईव्हीएम प्रोग्राम सिस्टम वेगळी

अमेरिकेची ईव्हीएम मशीन 'विंडो', 'लिनक्स'वर चालतात, भारताची ईव्हीएम अगदी ऑफलाईन आहे. वाय-फाय, ब्लूटुथ नाही. अमेरिकी यंत्र इंटरनेटशी जोडलेले असते. भारतातील ईव्हीएममधील प्रोग्रामिंगनंतर बदला येत नाही. अमेरिकी यंत्रात ते शक्य आहे. भारतीतील ईव्हीएममध्ये मुद्रित पावती देखील पाहता येते. अमेरिकेतल्या यंत्रांमध्ये तसे नाही, असे तुलनात्मक वर्णन भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com