BJP News : भाजपचा मोठा नेता अडचणीत : ठेकेदार आत्महत्याप्रकरणी कोर्टाने संपूर्ण कागदपत्रे मागवली

ईश्‍वराप्पा यांच्या स्वीय सहायकाला २५ हजार रुपये दिल्याचे व्हॉट्स ॲपवर चॅट झाले आहे. बिल कमिशन म्हणून चार लाख १५ हजार दिल्याचा मेसेज करण्यात आला आहे.
Santosh Patil Suicide Case
Santosh Patil Suicide CaseSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे (Bjp) माजी मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा (K. S. Eshwarappa) पुन्हा अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सादर केलेल्या ‘बी’ अहवालाचे संपूर्ण पुरावे न्यायालयाकडे सोपवावेत, असा आदेश ४२ व्या विशेष न्यायालयाने दिला आहे. त्यासाठी न्यायालयाने ३१ जानेवारीची मुदत दिली आहे. (Ex-BJP minister Eshwarappa in trouble again in contractor suicide case)

याआधी पाटील यांच्या कुटुंबीयांनी ‘बी’ अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उडुपी पोलिसांनी संपूर्ण कागदपत्रे सादर करण्यास विलंब का केला, असा सवाल करून पुन्हा न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने हा नवा आदेश काढला आहे. ईश्‍वराप्पा यांच्या स्वीय सहायकाला संतोष पाटील यांनी पैसे दिल्याचे व्हॉट्स ॲप चॅटमध्ये काही पुरावे समोर आले आहेत. व्हॉट्स ॲप चॅटची प्रतही सादर केली आहे.

Santosh Patil Suicide Case
Baramati News : रघुनाथदादा, आपल्या पिढीतील किती सोबती आता उरले आहेत? : पवारांचा भावनिक सवाल

पाटील यांच्या दोन मोबाईल फोनचा संपूर्ण डाटा आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील सर्व तांत्रिक पुरावे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पाटील यांचा मृतदेह ज्या हॉटेलमध्ये सापडला, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही आणि पोलिसांनी तयार केलेला व्हिडीओ तपास अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारीला स्वत: न्यायालयासमोर हजर होऊन सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. संतोष पाटील यांच्या भावाने याचिकेत खरा पुरावा लपवल्याचा आरोप केला आहे. प्रशांत पाटील यांच्यावतीने ॲड. के. बी. के. स्वामी यांनी युक्तिवाद केला.

Santosh Patil Suicide Case
Sharad Pawar : पितळी...कान तुटलेला कप...पोतं ते कपबशी... सोफा-खुर्च्या... : पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा

ईश्‍वराप्पा यांच्यासह सर्वांना कमिशन दिल्याचे संतोष पाटील यांच्या व्हॉट्स ॲप चॅटवरून उघड झाले आहे. हे काम करून घेतलेले ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्याशीही व्हॉट्स ॲप चॅट झाले आहे. ग्रामपंचायत अध्यक्षांशी झालेल्या चॅटचा उल्लेख पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या बी अहवालात केला आहे.

Santosh Patil Suicide Case
Dattatray Bharane : मीही पवारांचा पठ्ठ्या....: दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना ललकारले

ईश्‍वराप्पांच्या स्वीय सहायकाला २५ हजार दिल्याचा उल्लेख

ईश्‍वराप्पा यांच्या स्वीय सहायकाला २५ हजार रुपये दिल्याचे व्हॉट्स ॲपवर चॅट झाले आहे. बिल कमिशन म्हणून चार लाख १५ हजार दिल्याचा मेसेज करण्यात आला आहे. संतोष पाटील यांच्यासोबत ईश्‍वराप्पा यांची भेट घेणाऱ्या महांतेश शास्त्री यांनी पोलिसांसमोर जबाब दिला. ईश्‍वराप्पा यांच्या स्वीय सहायकला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे महांतेश शास्त्री यांनी उडुपी पोलिसांसमोर सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com