रशियाची मोठी खेळी; पळून गेलेल्या माजी राष्ट्राध्यक्षांनाच पुन्हा गादीवर बसवण्याची तयारी

युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष विक्टर फेडोरोविच यानुकोविच यांना राष्ट्राध्यक्ष करण्याचा रशियाचा डाव आहे.
Viktor Yanukovych, Vladimir Putin
Viktor Yanukovych, Vladimir PutinSarkarnama, Russia Ukraine War Update
Published on
Updated on

कीव : रशियाने (Russia) सलग सातव्या दिवशी युक्रेनच्या (Ukraine) विविध भागांत जोरदार हल्ला सुरूच ठेवला आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष विक्टर फेडोरोविच यानुकोविच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्राध्यक्ष करण्याचा रशियाचा डाव आहे. सध्याचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियाला जेरीस आणलं आहे. (Russia Ukraine War Update)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या धोरणांना झेलेन्स्की यांनी सातत्याने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यासाठी रशियाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. युक्रेनच्या राजधानीवर कब्जा मिळवत झेलेन्स्की यांना पायउतार केले जाऊ शकते. त्यानंतर यानुकोविच यांच्यावर युक्रेनची जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे. (Russia Ukraine War)

Viktor Yanukovych, Vladimir Putin
साडेचार तासात खारकीव सोडा! भारताकडून विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा

यानुकोविच हे सध्या बेलारूसमधील मिन्स्कमध्ये आहेत. ते युक्रेन सोडून पळून गेले आहेत. रशियाला युक्रेनमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यानुकोविच या समविचारी नेत्याची मदत होऊ शकते, असं मानलं जात आहे. त्यामुळे रशियाकडून तशी तयारी सुरू करण्यात आल्याचे समजते. युक्रेनमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या झेलेन्स्की यांच्या बाजूने युक्रेनमध्ये मोठं जनमानस तयार झालं आहे. रशियाच्या हल्ल्यानंतरही ते कीवमध्येच थांबून रशियाला प्रत्युत्तर देत असून जगाला आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोण आहेत यानुकोविच?

यानुकोविच हे २०१० मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्याआधी ते पंतप्रधानही होते. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी लगेच रशियाच्या बाजूने समझोते करण्यास सुरूवात केली. ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना या पदावरून हटवण्यासाठी रशियात आसरा घेण्यासाठी पळाले. सध्या ते बेलारूसमध्ये आहेत. २०१३ मध्ये त्यांना युक्रेनमध्ये मोठा विरोध झाला होता. याचवर्षी त्यांनी युरोपीयन संघाचे असोसिएशन अग्रीमेंट फेटाळले आणि देशात हिंसक आंदोलन सुरू झाले.

२००४ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाने विक्टर यांचे समर्थन केले होते. या निवडणुकीत विरोधी उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे व्हिक्टर यांना विजयी घोषित करण्यात आले. पण नागरिकांच्या विरोधानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल बदलत यानुकोविच यांना पराभूत म्हणून जाहीर केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com