साडेचार तासात खारकीव सोडा! भारताकडून विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा

युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात रशियाकडून जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे.
Russia Ukraine War News
Russia Ukraine War NewsSarkarnama :Russia Ukraine War News
Published on
Updated on

नवी दिल्ली : युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवसह खारकीव या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात रशियाकडून (Russia) जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. पुढील काही तासांत रशियाकडून खारकीववर कब्जा केला जाण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दुतावासाने भारतीयांना रात्री साडे नऊ वाजण्याच्या आत खारकीर शहर सोडण्याचे आवाहन केलं आहे. (Russia Ukraine War News)

भारतीय दुतावासाने (Indian Embassy) ट्विटरवरून ४ वाजून ५७ मिनिटांनी याबाबतची अडव्हायजरी जारी केली आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतच आजच खारकीव सोडण्यास सांगण्यात आले आहे. ‘भारतीय नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी तातडीने खारकीव सोडावे. खारकीवमधून पेसोचीन, बाबेय आणि बेझल्युडोव्हकाकडे लवकरात लवकर निघावे. कोणत्याही परिस्थितीत आजच याठिकाणी पोहचावे,’ असं दुतावासाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Russia Ukraine War News
आण्विक युध्दाचं सावट? पुतिन यांचं कुटुंब अंडरग्राऊंड; प्राध्यापकाचा खळबळजनक दावा

दुतावासाने युक्रेनियन वेळेनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे नऊपर्यंत भारतीयांना खारकीव सोडण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ दूतावासाच्या ट्विटनंतर भारतीयांकडे खारकीव शहर सोडण्यासाठी केवळ साडेचार तासांचा कालावधी उरला आहे.

दरम्यान, दुतावासाने मंगळवारी कीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तिथून तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. आजच तातडीने कीवमधून बाहेर पडावे. प्राधान्याने उपलब्ध रेल्वेगाड्या किंवा इतर कोणत्याही उपलब्ध माध्यमातून कीव सोडा,' असं आवाहन दुतावासाकडून करण्यात आलं होतं. आता सलग दुसऱ्या दिवशी खारकीवमधूनही तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच शहरामध्ये नवीन शंकरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा रशियाच्या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला आहे. (Russia-Ukraine War Update)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com