Petrol-Diesel Price : केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय! , आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?

fuel price India : जाणून घ्या, नेमका काय आहे नवीन निर्णय आणि इंधन दरावर काय परिणाम होणार?
Petrol and Diesel Prices
Petrol and Diesel PricesFile Photo
Published on
Updated on

Excise duty hike : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलरील एक्साइज ड्युटीवर दोन रुपये प्रतिलिटरची वाढ आजपासून केली आहे. याबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सचीव धीरज शर्मा यांनी नोटीसही जारी केली आहे. हा आदेश उद्यापासून म्हणजेच ८ एप्रिल पासून लागू होईल. पण दिलासादायक बाब म्हणजे सरकारचे म्हणणे आहे की या वाढीचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही.

एका अधिकृत आदेशानुसार सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन-दोन रुपये प्रति लिटरची वाढ केली आहे. आदेशात सांगण्यात आले आहे की, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढवून १३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवरील १० रुपये प्रतिलिटर केले गेले आहे.

Petrol and Diesel Prices
Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यानंतर घेतली महत्त्वपूर्ण पत्रकापरिषद अन् सांगितले...

मात्र आदेशात हे नाही सांगितले गेले की याचा किरकोळ किंमतीवर काय परिणाम होईल. मात्र सरकारचे म्हणणे आहे की किरकोळ किंमतीत बदल होणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने, पट्रोल अन् डिझेलच्या किंमतीत कपातीसोबत वाढलेल्या उत्पादन उत्पादन शुल्कास समायोजित केले जाईल.

Petrol and Diesel Prices
Deenanath Hospital : सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत गर्भवतीला उपचाराशिवाय थांबवलं : दीनानाथमध्ये 'साडे पाच' तास काय घडलं?

सरकारकडून अधिसूचना जारी होताच, पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मीडियात त्याबाबत बातम्या येऊ लागल्याने, सर्वसामान्यांना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात होते. परंतु किरकोळ किमतीवर कोणताही बदल होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com