Deenanath Hospital Dr. Ghaisas resignation : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पत्रकारपरिषदेत बोलताना रूग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले की, ''डॉ. सुश्रूत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत, ते आमच्याकडे मानद प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नाहीत परंतु, ते कन्सलटंट म्हणून मागील दहा वर्षांपासून आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रूग्णालय प्रशासनाकडे राजीनाम सुपूर्द केला. त्याचं कारण त्यांनी असं लिहिलं आहे की, गेले काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे मी अत्यंत दडपणाखाली वावरत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.''
तसेच ''धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वत:च्या सहन करण्यापलीकडे आहे व त्याच्या त्यांच्या आताच्या रूग्णांच्या उपचारावरही परिणाम होईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. यापरिस्थितीत त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेसे लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाहीत. त्यामुळे इतर रूग्णांवर अन्याय होण्यापेक्षा, तसेच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या त्यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील ते फक्त इथे काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.'' असं डॉ. घैसास यांनी सांगितले.
डॉ.केळकर ''याप्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेवून रूग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते स्वीकारेल. डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली आता असलेल्या रुग्णालयाची दोन ते तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था केली जाईल. या दोन ते तीन दिवसांत ते त्यांचे आहे ते महत्त्वपूर्ण काम संपवतील. माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील.'' अशीही माहिती दिली.
याचबरोबर डॉ. केळकर म्हणाले की, ''डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती, ती छोट्या रक्कमेसाठी कधीच नव्हती. ती मोठ्या रक्कमांसाठी विशेषकरून पाच लाख, दहा लाख व त्याच्या पुढे रक्कम असेल तर त्यासाठी ती होती. ती आपण मागील चार-पाच दिवसांपूर्वी काढून टाकली. आपल्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण असतो, यामुळे बोलण्यावागण्यात जी संवेदनशीलता पाहीजे, माधुर्य किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे ती कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा फार जास्त ताण असेल तर कधीकधी कमी जाणवते, ती सुधारण्यासाठी सूचना दिल्या असून प्रशिक्षणही सुरू केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजचा हा शेवटचा राजीनामा आहे.''
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी प्राथमिक अहवालात दोषी आढळल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रृत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. रुग्णालयाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहता राजीनामा देत असल्याचे घैसास यांनी सांगितलेले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.