कोरोना लस घेतल्याने अभिनेत्याचा मृत्यू? अखेर सत्य आलं बाहेर

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेते विवेक यांचे 17 एप्रिलला कोरोना लस घेतल्यानंतर निधन झाले होते.
Actor Vivekh
Actor VivekhFile Photo
Published on
Updated on

चेन्नई : तमिळ (Tamil) चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेते विवेक (Actor Vivekh) (वय 59) यांचे यावर्षी 17 एप्रिलला निधन झाले होते. विवेक यांनी मृत्यूच्या दोनच दिवस आधी कोरोना लस घेतली होती. यामुळे कोरोना लस (Covid Vaccine) घेतल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावरील पडदा सहा महिन्यांनी उलगडला असून, अखेर सत्य बाहेर आले आहे. तज्ञांच्या समितीने या प्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे.

तमिळनाडू सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर कार्यक्रम 15 एप्रिलला घेण्यात आला होता. या कार्यक्रमात विवेक यांनी कोरोना लस घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 एप्रिलला त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा 17 एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचा संबंध कोरोना लशीशी जोडण्यात आला होता.

या प्रकरणी राष्ट्रीय कोरोना लसीकरणविषयक दुष्परिणाम समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, या प्रकरणात लसीकरण हा केवळ योगायोग आहे. अभिनेते विवेक यांना अतिताणामुळे हृदयविकाराचा त्रास होता. त्यांना हृदय विकाराचा जोराचा झटका आला होता. त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत 100 टक्के ब्लॉक आढळला होता. त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Actor Vivekh
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना एसटीचा दणका; आज मध्यरात्रीपासून तिकिट महागलं

विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांनी घेतलेल्या कोरोना लशीबाबत त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूचा संबंध कोरोना लशीशी जोडला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना तमिळनाडूचे तत्कालीन आरोग्य सचिव डॉ. राधाकृष्णन म्हणाले होते की, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी विवेक यांनी पुढाकार घेतला होता. याचमुळे ते लस घेण्यास पुढे आले होते. लस घेण्याचा त्यांच्या हृदय विकाराशी कोणताही संबंध नाही.

Actor Vivekh
जोतिरादित्य शिंदे गायब; भाजपच्या पोस्टरसह प्रचारातही दिसेनात!

अतिशय लोकप्रिय असलेल्या विवेक यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. विवेक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला होता. मोदींनी म्हटले होते की, विवेक यांच्या अकाली निधनाने अनेक जणांना धक्का बसला आहे. त्यांच्या विनोदी अभिनयामुळे लोकांचे मनोरंजन झाले. त्यांचे चित्रपट आणि आयुष्य या दोन्ही गोष्टींतून त्यांची समाजाप्रतीची कटिबद्धता दिसून येते. त्यांचे कुटंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com