जोतिरादित्य शिंदे गायब; भाजपच्या पोस्टरसह प्रचारातही दिसेनात!

निवडणुकांच्या प्रचारात भाजप विरुद्ध काँग्रेस असा रंग चढला असला तरी जोतिरादित्य शिंदे हे मात्र प्रचारातून गायब आहेत.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya Scindia File Photo

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवले होते. यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान देण्यात आले होते. आता मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 1 लोकसभा आणि 3 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचारात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा रंग चढला असला तरी जोतिरादित्य शिंदे हे मात्र पोस्टरसह प्रचारातून गायब आहेत.

मध्य प्रदेशातील या पोटनिवडणुकांचा संघर्ष टोकाला पोचला आहे. भाजपकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष व्ही.डी.वर्मा हे दोघे प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत. परंतु, पक्षाचे स्टार प्रचारक असलेले जोतिरादित्य शिंदे हे प्रचारातून गायब आहेत. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील भाजप नेतृत्वासोबत शिंदे यांचे संबंध फारशे चांगले नसल्याचे ते प्रचारापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

शिंदे यांच्यासोबत काँग्रेस आमदारांनी भाजप सोडल्यामुळे मागील वर्षी 25 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी शिंदे यांनी आक्रमकपणे प्रचार करीत यातील जास्तीत जास्त जागा भाजपला जिंकून दिल्या होता. आता भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकांच्या प्रचारातून शिंदे यांनी काढता पाय घेतला आहे. याचबरोबर भाजपच्या पोस्टरवरुनही शिंदे गायब झाले आहेत.

Jyotiraditya Scindia
शिंदे राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर; भाचा विरुद्ध आत्या संघर्ष!

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.

Jyotiraditya Scindia
मोठी घडामोड : एनसीबीनं तातडीनं समीर वानखेडेंना दिल्लीत बोलावलं

शिंदे यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2009 ते 2012 मध्ये शिंदे हे केंद्रात वाणिज्य व उद्योग मंत्री होते. नंतर 2012 ते 2014 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होते. काँग्रेसच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. नंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com