फडणविसांचा पेनड्राईव्ह फुसका : सुप्रिया सुळेंची टीका

दुसरं काहीच बोलायला मार्ग नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.
Supriya Sule on Devendra Fadnavis pendrive bomb
Supriya Sule on Devendra Fadnavis pendrive bombSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसरं काहीच बोलायला मार्ग नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आजकाल महाराष्ट्रात कागद नाही तर पेनड्राईव्ह दाखवला जातो. मात्र, पहिल्या दोन आठवड्यातले पेन ड्राईव्ह बॉम्ब हे फारच फुसके निघाले, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. (Supriya Sule on Devendra Fadnavis pendrive bomb)

Supriya Sule on Devendra Fadnavis pendrive bomb
खासदार भावना गवळी हरविल्या, भाजपची पोलिसांत तक्रार…

महागाईसारखे अत्यंत गंभीर विषय आज देशासमोर आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या विषयावरून लोकांचे लक्ष भरकटवले जात असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.आधी कोविडमुळे तसेच आता रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे व्यावसायिकांना आपल्या मालाची निर्यात करताना फार अडचण होत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून यावर मार्ग काढण्याऐवजी सूडाचं राजकारण करीत असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली.

Supriya Sule on Devendra Fadnavis pendrive bomb
काश्मीरी पंडितांच्या दुःखाला भाजप राजकीय रंग देतयं ; मेहबूबा मुफ्ती संतापल्या

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘ मला राष्ट्रीय सुरक्षेची फार चिंता वाटत आहे. जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा आपण मोठी चौकशी लावतो. त्यामुळे ‘ईडी-सीबीआय’ कुणावर रेड करणार आहे, यासंदर्भातील बातम्या जर ४-५ दिवस आधीपासूनच बाहेर येत असतील तर या संस्थांच्या स्वायत्ततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.भारताची एक नागरीक म्हणून तसेच महिला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह न्यायाची अपेक्षा करतेय. अशाप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होणार असेल, तर ही चिंतेची बाब आहे, यावर त्यांनी विचार करावा.’’

कठीण परिस्थिी सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धांमुळे अडचणीचा काळ आहे. अशावेळी विरोधकांना सोबत घेऊन देशासाठी एकत्र काम करण्याऐवजी विरोधकांना अडचणीत आणण्यात येत आहे. राज्यातले सरकार पाडण्यासाठी हे होत असेल तर या प्रकारांनी सरकार पडणार नाही.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याने सरकार पाडण्यात त्यांना रस नसावा, असे वाटते.त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते, असे खासदार सुळे यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com