Farmer Agitation : शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी फोडल्या अश्रूधुरांच्या नळकांड्या; आश्वासनपूर्तीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक

Police firing : पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू गावाजवळ शेतकऱ्यांना रोखल्याने तणाव
Farmer Agitation
Farmer AgitationSarkarnama
Published on
Updated on

Punjab Political News :

दिल्लीसह उत्तरेत पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आजपासून 'चलो दिल्ली'ची घोषणा दिली होती. यावरून पंजाब आणि हरयाणाच्या सीमेवर शंभू येथे आज महाभारत घडले.

दोन वर्षांपूर्वी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन करून शेतकरीविरोधी तीन कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यावेळी हमीभाव देण्याचे तसेच इतरही काही आश्वासने केंद्र सरकारने दिली होती. (Punjab-Haryana Shambhu border)

दिलेल्या आश्वासनांची केंद्र सरकारने दोन वर्षांनंतरही पूर्ती न केल्याने शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. त्यानी 13 फेब्रुवारीला 'चलो दिल्ली'ची (Delhi Chalo) घोषणा देऊन आजपासून दिल्लीकडे कूच केली. शिवाय सरकारने आश्वासनपूर्ती केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. (Farmers Agitation)

Farmer Agitation
JACA Scam: हेमंत सोरेन यांच्यानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री ED च्या रडारवर

शेतकरी संघटनांच्या आवाहनानंतर आज हजारो शेतकऱ्यांनी हरियाणा आणि पंजाबमधून दिल्लीकडे आगेकूच सुरू केली. शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. शेतकऱ्यांनी हे बॅरिकेड्स उधळून लावले. त्यामुळे पोलिस आक्रमक झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

पण दिल्लीकडे ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन निघालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही अश्रूधुराच्या नळकांड्या ड्रोनमधूनही फोडण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी आणखी आक्रमक झाले. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा हक्क आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

ही घटना पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेजवळ घडली. एवढेच नव्हे तर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. जागोजागी काटेरी कुंपण आणि बॅरिकेड्स उभे केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजचे आंदोलन थांबलेले नाही, पण पोलिसांनी अडवल्याने शेतकरी थांबले आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने 16 फेब्रुवारीला एका दिवसाच्या ग्रामीण भारत बंदचे आवाहन केले आहे. सरकारने किमान हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसेच दोन वर्षांपूर्वी सरकारने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करावीत, यासाठी संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा आग्रही आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Farmer Agitation
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या ‘मेंदूत’ प्रचारासाठी AI वापराची सुपीक कल्पना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com