अहमदाबाद : गुजरात (gujrat) विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी अहमदाबादच्या दौऱ्यावर होते. काँग्रेसचा गुजरातमधील २७ वर्षांच्या सत्तेचा वनवास संपविण्यासाठी गांधी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. तसेच, शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज, तर घरगुती वापरासाठी ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. (Farmers' loans up to three lakhs will be waived; Free electricity will be given to agriculture : Rahul Gandhi)
गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला काँग्रेस चार लाख रुपयांची भरपाई देणार आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करण्याचे तिसरे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमधील सर्व शेतकऱ्यांची वीज थकबाकी माफ केली जाईल आणि दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. याशिवाय गुजरातमध्ये तीन लाख शाळा बांधल्या जातील आणि मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल. राज्यात १००० रुपयांचा एलपीजी गॅसचा सिलिंडर ५०० रुपयांना देण्यात येईल. बेरोजगारी आणि महागाईपासून सुटका करण्याचे आश्वासनही राहुल गांधींनी दिले. छोट्या व्यापाऱ्यांना मदत केली जाईल, ज्यामुळे लहान आणि मध्यम व्यावसायिकांना बळ मिळेल. गुजरातमधील १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा शब्दही त्यांनी दिला.
गेल्या २५ वर्षांपासून तुम्ही लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहात, हे मला समजले आहे. आपला लढा राजकीय पक्षाशी नाही, हा लढा भाजप काँग्रेसशी नाही. तुम्ही कोणाच्या विरोधात लढत आहात, हे समजून घेतले पाहिजे. गुजरातमध्ये उद्योगपतींचे कर्ज माफ होते, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज कधीच माफ होत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला
राहुल गांधी म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आज सरदार पटेल असते तर त्यांनी जे सांगितले असते, तेच आम्ही मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये केले आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांचेही तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले असते. गुजरातमध्ये सरदार पटेलांनी ज्या संघटनेचा पाया घातला, त्या संघटनेच्या लोकांना त्रास दिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.