FASTag New Rule: फास्टॅग युजर्ससाठी महत्वाची बातमी! 1 फेब्रुवारीपासून बदलणार नियम, तुम्हाला माहीत आहे का?

FASTag New Rule from 1 February: कार, जीप किंवा व्हॅनसाठी जारी केलेल्या फास्टॅगसाठी Know Your Vehicle (KYV) व्हेरिफिकेशन प्रोसेस आता १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू केली जाणार नाही.
FASTag New Rule from 1 February: Important Update:
FASTag New Rule from 1 February: Important Update:Sarkarnama
Published on
Updated on

FASTag rules change from 1 February. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.FASTag वापरण्याशी संबंधित एक महत्त्वाचा नियम1 फेब्रुवारी 2026 पासून बदलणार आहे. ज्यामुळे टोल प्लाझावर आणि FASTag अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

कार, जीप किंवा व्हॅनसाठी जारी केलेल्या फास्टॅगसाठी Know Your Vehicle (KYV) व्हेरिफिकेशन प्रोसेस आता १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू केली जाणार नाही. टोलबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. FASTag वापरणं अधिक सोपं आणि जलद होणार आहे.

नवीन नियमांनुसार NHAI ने व्हेरिफिकेशनचे काम बँकांकडे सोपवले आहे. आता फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांनाच वाहनाशी संबंधित सर्व माहिती तपासून बघायची आहे. वाहनाच्या डेटाबेसद्वारे हे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यामुळे तुम्हाला फास्टॅग अॅक्टिव्ह करण्यासाठी सारखं व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही.

नियम का बदलला

  • फास्टॅग बरोबर आहे ना, चुकीचा किंवा ड्युप्लिकेट फास्टॅग तर वापरत नाही ना, हे चेक करण्यासाठी Know Your Vehicle (KYV) ही प्रोसेस असायची.

  • अनेकदा तांत्रिक अडचणींमळे या प्रोसेसला वेळ लागयचा. त्यामुळे वाहनधाकांना अडचणी यायच्या.यामुळेच आता KYV न करण्याचा निर्णय घेतला.

  • बँक व कस्टमर केअरच्या फेऱ्या वाढत होत्या. याच तक्रारी लक्षात घेऊन NHAI ने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या नियमामुळे काय फायदा होणार?

  • फास्टॅग घेण्यासाठी उशीर लागणार नाही

  • टॅग घेताच लगेच वापरता येईल

  • कागदपत्रांची त्रास कमी होईल

  • टोल प्लाझावरील वेळ अन् वाद कमी होतील.

१ फेब्रुवारी 2026 पासून

  • नवीन FASTag घेण्यासाठी KYV अनिवार्य राहणार नाही.

  • वाहन पडताळणी आधीच व्हाहान डेटाबेस किंवा RC नुसार पूर्ण होईल.

  • पूर्वी जारी झालेले FASTag वर सक्तीच्या KYV ची गरज कमी होईल (केवळ खास प्रकरणात ती लागू होऊ शकते).

  • नवीन नियमांनुसार NHAI ने व्हेरिफिकेशनचे काम बँकांकडे सोपवले आहे.

  • आता फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांनाच वाहनाशी संबंधित सर्व माहिती तपासून बघायची आहे.

  • वाहनाच्या डेटाबेसद्वारे हे व्हेरिफिकेशन केले जाईल. फास्टॅग अॅक्टिव्ह करण्यासाठी सारखं व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com