Joseph Vijay: अखेर ठरलं! जोसेफ विजय यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तिसऱ्या भेटीनंतर राज्यपालांचा हिरवा कंदील

Joseph Vijay: तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून राज्यपालांनी टीव्हीके प्रमुख अभिनेता जोसेफ विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे.
Thalapathy Vijay political strategy
Thalapathy Vijay political strategy Sarkarnama
Published on
Updated on

Joseph Vijay swearing in ceremony as CM of Tamil Nadu: तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीके प्रमुख जोसेफ विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळं त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मुहूर्तही ठरला आहे.

उद्याच ९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विजय हे तामिळनाडूचे ९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा राजधानी चेन्नईमधील एका स्टेडियमध्ये पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता विजयचे फॅन्सही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com