Income Tax Bill : लोकसभेत नवीन इन्कम टॅक्स बिल सादर होणार ? हे बदल होणार

Nirmala Sitharaman discussion on the budget in Lok Sabha new Income tax bill : अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन इन्कम टॅक्स बिल सादर करण्याचा ओझरता उल्लेख केला होता.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावरील चर्चेला आज संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत उत्तर देतील. आज नवीन इन्कम टॅक्स बिल संसदेत सादर केले जाऊ शकते.

1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या 2025 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन इन्कम टॅक्स बिल सादर करण्याचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी घोषणा केली होती की नवीन विधेयक चालू अधिवेशनातच संसदेत मांडले जाईल. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.

Nirmala Sitharaman
Pravin Togadia : प्रवीण तोगडिया सरसंघचालकांचा शब्द राखणार, विश्व हिंदू परिषदेत घरवापसी होणार?

संसदेत चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे आज नवीन विधेयक संसदेत मांडले जावू शकते. जुना प्राप्तिकर विधेयक 1 एप्रिल 1962 पासून लागू झाला होता. कर विधेयकाच्या पुनरावलोकनाचा उद्देश प्राप्तिकराशी संबंधित कायदे सोपे करणे आहे. जेणेकरून ते सामान्य करदात्यांना अधिक संक्षिप्त आणि समजण्यास सोपे होईल.

नवीन कायद्यात कोणते बदल होण्याची शक्यता आहे?

  • डीटीसीचा मुख्य उद्देश कर तरतुदी सुलभ करणे,

  • अनावश्यक कलमे काढून टाकणे

  • कायदा सोप्या भाषेत लिहिला पाहिजे, जेणेकरून सामान्य लोकांना तो सहज समजेल.

Nirmala Sitharaman
Shivsena News : शिंदेच्या शिवसेनेत चाललंय काय ? संभाजीनगरमध्ये स्थानिक नेत्यांचे जमेना!

या बदलांमुळे टॅक्स कायदे समजून घेणे सोपे होईल, कायदेशीर वाद कमी होतील आणि संपूर्ण प्रणाली करदात्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर होईल, असा कर तज्ञांचा विश्वास आहे.

नवीन कर विधेयकात कोणावरही नवीन कराचा बोजा लादला जाणार नाही, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. २०२५ च्या अर्थसंकल्पात कर स्लॅबमध्ये केलेले बदल यामध्ये समाविष्ट केले जातील. नवीन विधेयकात अनावश्यक शब्द काढून टाकले जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com