FIR Against Brijbhushan Singh : कुस्तीपटूंच्या आंदोलनालातून मोठी अपडेट; अखेर बृजभूषण यांच्यावर FIR दाखल होणार..

FIR Against Brijbhushan Sharan Singh : "FIR नोंदवण्यापूर्वी आरोपांची चौकशी करणे आवश्यक.."
FIR Against Brijbhushan Sharan Singh :
FIR Against Brijbhushan Sharan Singh : Sarkarnama
Published on
Updated on

FIR Against Brijbhushan Sharan Singh : भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय कुस्तीगीर परिषेदेचे प्रमुख बृजभूषण सिंग यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. बृजभूषण यांच्या विरोधात आता कुस्तीपटूंनी जंतरमंतर जमलेल्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे मान्य केले आहे. यामुळे आता सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल यांनी ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे.

FIR Against Brijbhushan Sharan Singh :
Darwha APMC : ‘मविआ’ विरुद्ध शिवसेनेत (शिंदे गट) घमासान, भाजपला दाखवला बाहेरचा रस्ता !

चौकशी झाली पाहिजे ;

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachood) आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही माहिती दिली. त्यानंतर खंडपीठाने दिल्ली पोलीस आयुक्तांना अल्पवयीन तक्रारदाराच्या धमकीच्या प्रकरणातही चौकशी करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी अल्पवयीन तक्रारदाराच्या सुरक्षेला धोका असल्याचा आरोप केला होता. 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप करणाऱ्या इतर सहा कुस्तीपटूंविरुद्ध धमकी संदर्भातही तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला.

सुरक्षेचा प्रश्न :

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी तुषार मेहता यांना अल्पवयीन मुलाने सादर केलेल्या पुराव्यांचा संदर्भ दिला. यासोबतच या अल्पवयीन मुलाने भीतीपोटी दिल्ली सोडल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचवेळी सिब्बल यांनी या काळात सर्व तक्रारदारांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली विशेष कार्यदलामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

FIR Against Brijbhushan Sharan Singh :
Sushma Andhare on Barsu : बारसूत आशिष देशमुखांची १८ तर अधिकाऱ्यांची ९२ एकर जमीन; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

सॉलिसिटर जनरल यांनी ही माहिती दिली :

सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, 'तक्रारीत दखलपात्र गुन्हा उघड झाल्यानंतर एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला.' याचिकाकर्त्यांनी प्रकरण प्रलंबित ठेवण्याच्या मागणीला मेहता यांनी आक्षेप घेतला, कारण याचिकेत फक्त एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. अल्पवयीन तक्रारदाराला सुरक्षा पुरवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याबाबत न्यायालयाने दिल्ली पोलिसांना शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले.'

FIR Against Brijbhushan Sharan Singh :
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे रस्त्यावर सही करणारे मुख्यमंत्री, अन् त्यांच्या तर खिशालाही पेन राहात नव्हता !

कुस्तीपटूंनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, 'या वर्षी जानेवारीमध्ये तक्रारी करूनही केंद्राने कोणतीही कारवाई केली नाही. कुस्तीपटूंच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने एक तपास समिती स्थापन केली होती. मात्र याबाबतचा निकाल कळलेला नाही. सिंग यांना क्लीन चिट देण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पोलिस एफआयआर नाकारू शकत नाहीत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com