Congress, Digvijay Singh
Congress, Digvijay SinghSarkarnama

Congress Vs RSS : माजी मुख्यंत्र्यांवर एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल; काय आहे प्रकरण ?

Congress Leader Post On Social Media Against RSS : काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांवर धार्मिक तेढ वाढवण्याच्या केला आरोप
Published on

FIR Against Congress Former CM : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख एम.एस. गोळवलकर यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी काँग्रेसचे मोठे नेते अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात एकाच दिवशी रविवारी (ता. ९) दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे त्यांची अडचण वाढली आहे. (Latest Political News)

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी माधव गोळवलकर यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सिंह यांनी गोळवलकर यांनी न केलेल्या गोष्टींचा उल्लेख केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सिंह यांच्याविरोधात इंदूर आणि गुना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला इंदूर शहराचे पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांनी माजी सरसंघचालकांच्या नावे कधीही न बोललेल्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार आली आहे. या तक्रारीवरून दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Congress, Digvijay Singh
AAP Vs Congress : माजी उपमुख्यमंत्र्यांची कमाल ! मिळकत साडेचार कोटी तर खर्च केले...; काँग्रेसच्या नेत्याला अटक

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या पोस्टबाबत इंदूर उच्च न्यायालयाचे वकील राजेश जोशी यांनी आक्षेप घेतला. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली. या पोस्टद्वारे दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केला. तसेच धार्मिक भावना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. त्यांनी संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांचे छायाचित्र असलेली अनियंत्रित आणि खोटी पोस्ट प्रसारित केली आहे. गुरुजींबद्दलचा अशा प्रकारचा खोटा प्रचार काँग्रेस नेत्यांची निराशा दर्शवतो, असेही जोशी म्हणाले.

Post of Digvijay Singh
Post of Digvijay SinghSarkarnama

काय आहे पोस्टमध्ये ?

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "गोळवलकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, मी आयुष्यभर इंग्रजांचा गुलाम राहायला तयार आहे, पण मला मुस्लिम, दलित, मागासलेल्यांना हक्क देणारे स्वातंत्र्य नको." पोस्टमध्ये आणखी एक गोष्ट लिहिली आहे की, "गुरु गोळवलकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की जेव्हा जेव्हा त्यांच्या हातात सत्ता येईल तेव्हा देशाची संपत्ती, राज्यांची जमीन आणि जंगले दोन-तीन विश्वासू व्यक्तींच्या हाती द्या. ९५ टक्के जनता भिकारी बनवा. त्यानंतर सात जन्म सत्ता हाताबाहेर जाणार नाही."

Congress, Digvijay Singh
Ganpat Gaikwad Fake Facebook Account : भाजप आमदार महिलांना पाठवायचा मेसेज ? ; फेक अकाऊंट उघडकीस, एकाला अटक

सिंग यांच्यावर या कलमांतर्गत गुन्हा..

या प्रकरणाबाबत इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर म्हणाले की, "गुरु गोळवलकर यांनी न बोललेले विधान त्यांचे म्हणणे म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या संदर्भात तुकोगंज पोलीस ठाण्यात कलम १५३-अ, ४६९, ५००, ५०५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्याचवेळी दिग्विजय सिंह यांच्या पदाबाबत राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com