आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि माजी दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर गैरवर्तन प्रकरणी विभव कुमार यांच्या विरोधात FIR दाखल केला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी आज त्यांचा जबाब नोंदवून घेतला. तर विभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विभव कुमार यांच्याविरोधात आयपीसी कलम 354,506,509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी गुरुवारी पोलीस स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहचली आणि जवळपास चार तासानंतर त्यांच्या घरून परतले. या दरम्यान स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांसमोर त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी आपला जबाब नोंदवला. त्यांनी आपल्या जबाबात 13 मे रोजी झालेल्या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला. त्यांनी जी तक्रार केली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांचं नाव नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विभव कुमार हे केजरीवालांचे (Arvind Kejriwal) अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे मालीवाल प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात मालीवाल (Swati Maliwal) या आपच्या खासदार असून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनीही विभव कुमार यांच्यावर केजरीवाल कारवाई करतील, असे म्हटले आहे
विभव कुमार आणि केजरीवालांची मैत्री खूप जुनी आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, विभव कुमार आमि केजरीवाल काही वर्षांपासून एकत्रित काम करत आहेत. विभव हे व्हिडिओ जर्नालिस्ट होते. ‘इंडिया अगेन्स करप्शन’ कडून एक नियतकालिक प्रकाशित केले जात होते. त्यासाठी विभव व्हिडिओ एडिटिंगचे काम करायचे
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.