पुन्हा चेर्नोबिलची भीती; युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग

रशियाचा युक्रेनवरील हल्ला नवव्या दिवशीही सुरूच आहे. पण शुक्रवारी जगाला चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील स्फोटानंतर झालेल्या हानीची आठवण झाली.
Zaporizhzhia Nuclear Power Plant
Zaporizhzhia Nuclear Power PlantSarkarnama

कीव : रशियाचा (Russia) युक्रेनवरील हल्ला नवव्या दिवशीही सुरूच आहे. पण शुक्रवारी जगाला चेर्नोबिल (Chernobyl) अणुऊर्जा प्रकल्पातील स्फोटानंतर झालेल्या हानीची आठवण झाली. युरोपातील सर्वात मोठ्या युक्रेनमधील (Ukraine) अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागल्याची बातमी आली अन् काळजाचा ठोका चुकला. रशियाच्या सततच्या बॉम्बहल्ल्यामुळे ही आग लागल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे.

रशियाने युक्रेनमधील झेपोरीयझिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरावर जोरदार हल्ला चढवला आहे. सध्या युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झेपोरीयझिया याठिकाणी आहे. रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे या प्रकल्पातून अचानक धुराचे लोट सुरू झाल्याचा व्हिडीओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की कार्यालयाचे सल्लागार यांनी ट्विट केला आहे. त्यांनी युक्रेनसह जगभरात एकच खळबळ उडाली. (Zaporizhzhia Nuclear Power Plant)

Zaporizhzhia Nuclear Power Plant
पुतीन यांच्याशी मोदी बोलले अन् काही तासांतच रशियाचा प्लॅन ठरला!

एसोसिएटेड प्रेस या न्युज एजन्सीने युक्रेनमधील एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून धुराचे लोट उठत असल्याचे दिसत आहे. युक्रनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगी नतर रशियाच्या सैन्याला अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला थांबवण्याचे आवाहन केले. कुलेबा यांनी ट्विट करून म्हटलं की, या प्रकल्पाचा स्फोट झाला तर चेर्नोबिलपेक्षा दहापट मोठा स्फोट होईल. रशियन सैन्यानं तातडीने आग विझवावी. (Russia Ukraine War)

आगीवर मिळवले नियंत्रण

अणुऊर्जा प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्रांमध्ये आग लागली होती. युक्रेनच्या आपत्कालीन विभागाकडून तातडीने याठिकाणी धाव घेण्यात आली. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील धोका टळला आहे. पण रशियाकडून असाच बॉम्बहल्ला सुरू राहिला तर प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाने काही दिवसांपूर्वी चेर्नोबिल प्रकल्पावर ताबा मिळवला आहे.

काय घडलं होतं चेर्नोबिल प्रकल्पात?

जगातील सर्वात भयानक आण्विक अपघातांपैकी एक अपघात म्हणजे चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेला स्फोट. 26 एप्रिल 1986 रोजी मध्यरात्री प्रकल्पाच्या युनिट चारमधील अणूभट्टीमध्ये जोरदार स्फोट होताच मोठा किरणोत्सार सुरू झाला. हा किरणोत्सार एवढा भयानक होता की अणुभट्टीवर आच्छादन टाकणयाचं काम दहा हजार कामगार सलग चार वर्ष करत होते. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास दोन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं. आजही या अपघाताच्या आठवणी युक्रनमध्ये ताज्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com