राज्यसभेत भाजपची ऐतिहासिक एंट्री; या राज्यात पहिल्यांदाच पक्षाचा खासदार

बहुतेक राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
BJP
BJPFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : बहुतेक राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने इतिहासही घडवला आहे. दक्षिणेतील एका राज्यातून भाजपचे खासदार पहिल्यांदाच राज्यसभेत पाऊल ठेवणार आहेत. त्यामुळं भाजपकडून जल्लोष केला जात आहे.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजपचे राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. एस. सेल्वागणपती असं त्यांचं नाव आहे. राज्याचे सचिव आर. मौनीसामी यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. राज्यसभेत पहिल्यांदाच पुदुच्चेरीचे प्रतिनिधित्व भाजपचे सदस्य करतील. पुदुच्चेरीमध्ये राज्यसभेची एकच जागा आहे. तिथून पहिल्यांदा काँग्रेसचे खासदार होते. त्यानंतर द्रमुक, अण्णाद्रमुक या तीन पक्षांचे नेते आलटून-पालटून खासदार होत होते.

BJP
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचे पुणे कनेक्शन; CBI कडून एकाला अटक

पुदुच्चेरीमध्ये सध्या भाजपच्या पाठिंब्यावर एआयएनआरसीचे सरकार आहे. भाजपच्या उमेदवाराला या पक्षाचंही समर्थन होतं. त्यांच्याविरोधात पाच अपक्षांनी अर्ज भरला होता. पण त्यांचे अर्थ छानणीत बाद झाले. त्यामुळे सेल्वागणपती यांचा मार्ग सुकर झाला. अर्ज मागे घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. 1962 नंतर ते पुदुच्चेरीमधून राज्यसभेत जाणारे दहावे सदस्य असतील. त्यांच्या निवडीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पुदुच्चेरीची निवड ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

रजनी पाटील बिनविरोध

निवडणूक लढविण्यावर पक्षश्रेष्ठी ठाम असल्याचे सांगून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने सोमवारी अखेर माघार घेतली आणि काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या बिनविरोध राज्यसभेच्या सदस्या झाल्या. ‘माझ्यावरील जबाबदारी नेटाने पार पाडण्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक नको, म्हणून अर्ज मागे घेतल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यानुसार भाजपने अर्ज मागे घेतला. पण भाजपचे विधानसभेतील छुपे संख्याबळ फारसे वाढलेले नाही, असाही याच अर्थ निघालेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com