Savarkar Jayanti : घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांकडून मंगलमय सोहळ्यात मिठाचा खडा; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

जगात नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी झालेली आहे.
Veet Savarkar Jayanti
Veet Savarkar JayantiSarkarnama

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून केलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेतात, हे दुर्दैवी आहे. घराणेशाहीमध्ये अडकलेल्या पक्षांना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्वाद आणि सावरकर यांचं वावडं आहे, असं आज पहायला मिळतंय. काही लोकांनी अशा मंगलमय सोहळ्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण, संपूर्ण देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (First time in Maharashtra Sadan, birth anniversary of freedom fighter Savarkar was celebrated)

महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच भाजप व शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शिंदे यांनी खडे बोल सुनावले.

Veet Savarkar Jayanti
New Parliament Inauguration : ऐतिहासिक क्षण! देशाला मिळालं नवीन संसद भवन,पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवीन संसद भवनाचे उद्‌घाटन होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मोदी यांनी २०१९ मध्ये नवीन संसद भवनाची संकल्पना मांडली आणि अत्यंत कमी कालावधीत ती उभारून तिचे आज उद्‌घाटन होत आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी ही वास्तू आहे. या नव्या संसदेत लोकशाही बळकट होईल, असा विश्वास आपल्या सर्वांना आहे.

Veet Savarkar Jayanti
DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ लिहिणारे इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर ; सावित्रीबाई फुलेंचा समावेश..

काही लोकांना सावरकरांचं वावडं आहे. त्यामुळे संसद भवनाच्या उघाटनाचा कार्यक्रम सावरकरांच्या जयंती दिवशीच होत असल्याने बहिष्कारसारखा प्रयत्न होतो आहे. पण जगातील अनेक देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेला असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणण्याचे मोठे काम मोदी यांनी केले आहे, असा दावाही शिंदे यांनी केला.

Veet Savarkar Jayanti
Ram Shinde Latest News : राम शिंदेंनी वाढवले विखेंचे टेन्शन; फडणवीसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा

आज आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये अभिमानाने लोक घेतात. जगात नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी झालेली आहे. ज्यांना पोटदुःखी झालेली आहे, त्यांना या देशातील जनता जमाल गोटा देईल. आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. नवीन संसद भवनाचे उद्‌घाटन आणि महाराष्ट्र सदनात सावरकर जयंती साजरी करतो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com