New Parliament Inauguration : ऐतिहासिक क्षण! देशाला मिळालं नवीन संसद भवन,पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Parliament Inauguration by PM Narendra Modi : २० विरोधी पक्षांचा बहिष्कार तर...
New Parliament Inauguration
New Parliament Inauguration Sarkarnama
Published on
Updated on

New Parliament Building News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं आज(दि.२८) पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. पूजनानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बिर्लांनी सेंगोलची स्थापना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी स्थापना केली.

तसेच पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी संसद भवन बांधणाऱ्या कामगारांचे आभार मानले, तसेच त्यांचा सन्मानही केला. यावेळी संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

New Parliament Inauguration
DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ लिहिणारे इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर ; सावित्रीबाई फुलेंचा समावेश..

देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येत आहे.. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे अवघ्या देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणावेळीही सर्वधर्म समभावाचं दर्शनही घडलं.

संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आणि त्यात एका गोष्टीचीही जोरदार चर्चा आहे नव्या संसदेत वाढलेल्या जागांची. जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे. नवी इमारत बांधताना साहजिकच भविष्यातल्या गरजांचा विचार करुनच ती बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्यात खासदारांची भविष्यात वाढू शकणारी संख्याही गृहीत धरली आहे.

New Parliament Inauguration
New Parliament Inauguration : मोदींचं अचूक टायमिंग ; नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी 'सर्वधर्म' समभावाचं दर्शन !

संसद भवनात राजदंडाची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेनं करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा दुपारी...

नव्या संसद भवना(New Parliament Building)च्या लोकार्पण सोहळ्याचा दुसरा टप्पा 11 च्या सुमारास सुरु होणार आहे. वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. नव्या संसद भवनाला तीन दरवाजे आहेत. त्या तीन दरवाज्यांना अनुक्रमे ज्ञानद्वार, कर्मद्वार आणि शक्तीद्वार अशी नावे आहेत.

New Parliament Inauguration
Brij bhushan Singh News : खासदार ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढणार? कुस्तीपटू 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

नवीन संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या 60 हजार कामगारांनी योगदान दिले आहे, त्यांचाही यावेळी पंतप्रधान मोदी सन्मान केला. त्यांनी सेंगोलची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग दंडवक घातला. यानंतर साधू संतांच्या नेतृत्वाखाली आणि वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नव्या संसद भवनाची इमारत बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राचा मास्टर प्लॅन आणि नवीन गरजांनुसार इमारतींचे डिझाईन तयार करण्यात या कंपनीचा सहभाग आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com