Bangladesh MP Death : 'मित्रानेच दिली होती पाच कोटींची सुपारी' ; बांगलादेशी खासदाराच्या हत्येप्रकरणी 'CID'चा खळबळजनक दावा!

MP Anwarul Azim Death in Kolkata : सीआयडीचे आयजी अखिलेश चतुर्वेदी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे.
Anwarul Azim
Anwarul AzimSarkarnama

Kolkata Crime News : बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार यांच्या हत्येच्या प्राथमिक तपासात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. खासदार अनार यांच्या मित्रानेच त्यांच्या हत्येसाठी तब्बल पाच कोटींची सुपारी दिली होती, असा दावा सीआयडी कडून केला गेला आहे.

तर बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी बुधवारी म्हटले होते की, 13 मे पासून बेपत्ता असलेल्या अनार यांची हत्या झाली आहे आणि तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी म्हटले होते की घटनेचा तपास राज्य सीआयडी करत आहे.

Anwarul Azim
Bangladesh MP Death : बांगलादेशच्या खासदाराचा कोलकातामधील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह!

सीआयडी अधिकाऱ्यांनी पीटीआयला माहिती दिली की, हा एक पूर्वनियोजित कट होता. खासदाराच्या एका जुन्या मित्रानेच त्यांना मारण्यासाठी जवळपास पाच कोटींची रक्कम दिली होती. त्यांनी म्हटले की, अवामी लीगच्या खासदाराचा मित्र अमेरिकी नागरिक आहे आणि त्याचा कोलकातामध्ये एक फ्लॅट आहे.

सीआयडीचे आयजी अखिलेश चतुर्वेदींनी बुधवारी म्हटले होते की, पोलिसांकडे विश्वसनीय इनपुटच्या आधारावर अनार यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली गेली आहे, परंतु अद्याप पर्यंत त्यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. तसेच, पोलिसांना जेव्हा विचारले गेले की, पोलिसांना कोलकातामधील बाह्य भागातील न्यू टाउन येथील अपार्टमेंटमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत का? यावर कोलकाता पोलिसांकडून सांगितले गेल की, आमची फॉरेन्सिक टीम संशयीत घटनास्थळी तपास करत आहे आणि याबाबत आताच काही म्हणणे घाईचे होईल.

बेपत्ता खासदार कथितरित्या उपचार करण्यासाठी 12 मे रोजी कोलकातामध्ये आले होते. त्यांचा तपास सहा दिवसांनंतर तेव्हा सुरू झाला जेव्हा उत्तर कोलकातामधील बारानगरचे रहिवासी आणि बांगलादेशी खासदाराचे परिचित गोपाल बिस्वास यांनी 18 मे रोजी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. कारण अनार कोलकातामध्ये बिस्वास यांच्या घरीच थांबले होते.

Anwarul Azim
HD Deve Gowda : 'माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस, लवकरच...' ; प्रज्ज्वल रेवण्णाला देवगौडांचा कडक इशारा!

आपल्या तक्रारीत बिस्वास यांनी म्हटले की, अनार 13 मेच्या दुरापी डॉक्टरांना भेटण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री जेवणासाठी परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच बिस्वास यांनी दावा केला होता की 17 मे पासून संपर्क झाला नव्हता. यामुळे त्यांनी त्याच दिवशी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com