HD Deve Gowda : 'माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस, लवकरच...' ; प्रज्ज्वल रेवण्णाला देवगौडांचा कडक इशारा!

Prajwal Revanna Scandal: जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले तर... असंही म्हटलं आहे.
HD Deve Gowda
HD Deve GowdaSarkarnama
Published on: 
Updated on: 

karnataka sex scandal : कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघाचे जेडीएसचे खासदार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा अद्यापही फरार आहे. यासंदर्भात आता खुद्द माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी प्रज्ज्वल रेवण्णाला कडक इशारा दिला आहे आणि लवकरात लवकर भारतात परत येऊन आत्मसमर्पण करावं, असं म्हटले आहे.

याप्रकरणी माजी पंतप्रधान एचडी देवगौडा(HD Deve Gowda) यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मी प्रज्ज्वल रेवण्णाला इशारा दिला आहे की, तो जिथे कुठं असेल तिथून त्याने तत्काळ परत यावे आणि इथे भारताच्या कायदेशीर प्रक्रियेत सहभागी व्हावे, त्याने अजून माझ्या संयमाची परीक्षा पाहू नये. तसेच, जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले तर त्यालाा कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

HD Deve Gowda
Devaraje Gowda : ... म्हणून प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भाजप नेत्यास झाली अटक!

माजी पंतप्रधान देवगौडा यांनी 'माय वॉर्निंग' या मथळ्याखाली दोन पानांचे इशारा पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिले की, 'मागील काही आठवड्यात लोकांनी माझ्याविरोधात आणि माझ्या कुटुंबाविरोधात कटू शब्दांचा वापर केला आहे. मी लोकांना हेही सांगू शकत नाही की मला प्रज्ज्वलच्या कृतीबाबत काहीच माहीत नव्हते.'

HD Deve Gowda
Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणात ट्विस्ट; महिला आयोगाचा मोठा दावा

तसेच, मी त्यांना हेही समजावू शकत नाही की मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. मला त्याच्या परदेश गमनाबाबत काहीच माहिती नव्हते. मी अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यावर विश्वास ठेवतो. मी देवावर विश्वास ठेवतो आणि मला माहीत आहे की, देवाला सर्व काही सत्य माहीत आहे.' असंही देवगौडा म्हणाले आहेत.

जवळपास महिनाभरापूर्वी देश सोडून पळालेल्या प्रज्ज्वल रेवण्णाला इशारा देत एचडी देवगौडा यांनी म्हटले की, प्रज्ज्वलला त्याच्या आजोबांबाबत जराही सन्मान असेल तर त्याने परत यावे. तसेच त्याने पुढे म्हटले की, मी केवळ एक काम करू शकतो. मी प्रज्ज्वलला कडक इशारा देऊ शकतो. तो जिथं कुठे असेल त्याने तिथून येऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावं, एवढंच सांगू शकतो. हे आवाहन नाही तर ही एक चेतावनी आहे. असंही देवगौडा म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com