UP Politics : भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांचा पत्नीसह विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
UP Politics
UP Politics Sarkarnama

UP Politics : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी घटना उघडकीस आली आहे. भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री गुरविंदर सिंह उर्फ ​​विकी छाबरा आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. कौटुंबिक कलहातून दोघांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी रिजन्सी रुग्णालयात पोहोचून विक्की छाबरा यांची प्रकृती जाणून घेतली.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून या जोडप्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, त्यामागील कारणे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेली नाहीत. विकी छाबरा आणि त्याच्या पत्नीला गंभीर अवस्थेत रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकी छाबरा हे यूपी पंजाबी अकादमीचे उपाध्यक्ष आहे. विकी छाबरा हे माजी राज्यमंत्री आहेत.

UP Politics
BJP Mission 2024 : "मौत का सौदागर" ते "चायवाला" ; BJP चे असे आहे २०२४ चे टार्गेट..

यासोबतच ते भारतीय जनता युवा मोर्चा दिल्लीचे प्रभारी आणि विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचे मित्र आहेत. रुग्णालयात पोहोचलेल्या सतीश महाना यांनी सांगितले की, शुद्धीवर आल्यानंतरच या दोघांनी एवढे टोकाचे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले हे समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com