माजी सरपंच पक्षात दाखल होताच मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आम्हीच पुन्हा येणार!

गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण तापले आहे.
Pramod Sawant
Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण तापले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) गळती लागल्याचे चित्र होते. आता भाजपने काँग्रेस (Congress) नेत्यांना फोडण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस नेते व कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोसेफ सिक्वेरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कळंगुटच्या माजी सरपंचांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही आमचा पक्ष कळंगुटमध्ये आणखी भक्कम केला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

सेक्वेरा यांनी कळंगुटमधून विधानसभा लढण्याची इच्छा जाहीर केली आहे. पक्षाने तिकीट दिल्यास मी कलंगुटमधून लढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. कळंगुटमधून सिक्वेरा हे भाजपचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. यात काँग्रेसनेही आघाडी घेत भाजपच्या काही नेत्यांना फोडले होते. आता भाजपने याची परतफेड करण्यास सुरवात केली आहे. (Goa News Updates)

Pramod Sawant
पक्ष सोडताच माजी केंद्रीय मंत्र्याला काँग्रेसनं ठरवलं पळपुटा!

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) तिकिट भाजपने कापले. त्यामुळे उत्पल यांनी भाजपला रामराम करून पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता लगेचच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या रुपाने भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला होता.

Pramod Sawant
मौर्य यांना टक्कर देण्यासाठी भाजपनं अखेर काँग्रेसमधील बडा नेता शोधला

भाजपला गळती

राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र असून, आतापर्यंत 4 आमदारांनी पक्ष सोडला आहे. मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत. अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Goa Political News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com