पक्ष सोडताच माजी केंद्रीय मंत्र्याला काँग्रेसनं ठरवलं पळपुटा!

काँग्रेसला धक्का देऊन माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
Rahul Gandhi with R.P.N.Singh
Rahul Gandhi with R.P.N.Singh Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला आहे. यावरून आता काँग्रेसने सिंह यांच्यावर हल्लाबोल केला असून, त्यांना पळपुटे ठरवले आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, सरकारच्या विरोधात काँग्रेस देशभरात लढा उभारत आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात हा लढा सरकारी संसाधने आणि सरकारी संस्थांच्या विरोधात आहे. ही विचारसरणीची लढाई आहे. याचबरोबर सत्यासाठीचा हा लढा असून, यात तुम्ही धैर्य आणि दृढ निश्चयाने उतरणे आवश्यक असते. ही लढाई पळपुट्यांसाठी नाही, असे आम्हाला वाटते.

काँग्रेस नुकतीच तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला आहे. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सिंह हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे.

Rahul Gandhi with R.P.N.Singh
स्वामीप्रसाद मौर्य यांना धक्का; समाजवादी पक्षानं मुलाचंच तिकीट कापलं!

सिंह हे भाजपमध्ये दाखल झाले असून, त्यांचा सामना भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले मातब्बर ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याशी होण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ते पडरौना मतदारसंघातून मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. या मतदारसंघात मौर्य हे विद्यमान आमदार आहेत. मौर्य यांच्या विरोधात लढण्यासाठी बलाढ्य नेत्याचा शोध भाजपकडून सुरू होता. अखेर सिंह यांच्या रुपाने हा नेता मिळाला आहे. सिंह आणि मौर्य या दोघांनीही या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. (RPN Singh News Updates)

Rahul Gandhi with R.P.N.Singh
मौर्य यांना टक्कर देण्यासाठी भाजपनं अखेर काँग्रेसमधील बडा नेता शोधला

सिंह यांच्यामुळे भाजपला फायदा होणार असून, काँग्रेसप्रमाणेच समाजवादी पक्षालाही याचा फटका बसू शकतो. सिंह हे कुशीनगर जिल्ह्यातील आहे. ते 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कुशीनगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेच काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी-2 मध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले होते. नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पडरौना विधानसभा मतदारसंघाचे 1996, 2002 आणि 2007 मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. (RPN Singh joins BJP)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com