Sonia Gandhi Hospitalised : मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली

Congress News : डॉक्टरांच्या देखरेखीखाली गांधी यांच्यावर उपचार सुरु
Sonia Gandhi
Sonia Gandhi sarkarnama

Delhi News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोनिया गांधी यांना गुरुवारी (दि. २) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं. गांधी यांची तब्येत गुरुवारपासून बिघडली होती. गुरुवारीच त्यांना ताप आला होता. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर आणि नर्सेसच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आलंय. तसेच गांधी यांच्या विविध वैद्यकीय चाचण्याही केल्या जात आहेत. चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटचे सीनियर कन्सल्टंट डॉ. अरुप बासु यांनी गांधी यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

Sonia Gandhi
Sushma Andhare News: गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी, बच्चू कडूंना द्यावी संधी !

...हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो!

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Soniya Gandhi )यांनी काँग्रेसच्या 85 व्या महाअधिवेशन छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचं 85 व्या महाअधिवेशन सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत. सोनिया गांधी आज अधिवेशनात हजर राहिल्या होत्या.

Sonia Gandhi
Dhangekar Meet Girish Bapat : विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली बापटांची भेट; खासदारांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. केंद्र सरकारने देशातील केंद्रीय यंत्रणांचा ताबा मिळवला आहे. आजपर्यंत भारतात काँग्रेसने लोकशाही मजबूत केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपण्यास मदत झाली. मात्र भारत जोडो यात्रा हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो असं वक्तव्य सोनिया गांधी यांनी केलं आहे.

सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्या सध्या 76 वर्षांच्या आहेत. त्यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com