Lavoo Mamledar : कारचा धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाची मारहाण, माजी आमदाराचा मृत्यू

Goa ex-MLA Lavu Mamledar news : लवू मामलेदार यांचे बेळगावात (Belgaum) नेहमी येणे-जाणे होते. ते नेहमी खडे बाजार परिसरातील श्रीनिवास लॉजमध्ये उतरत. यावेळीही त्यांनी याच लॉजमध्ये खोल्या आरक्षित केल्या होत्या. मात्र, शनिवारी त्यांच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली.
Lavoo Mamledar
Lavoo MamledarSarkarnama
Published on
Updated on

Belgaum News, 16 Feb : कॅबला कार घासल्याचे निमित्त होऊन संतप्त कॅबचालकाने केलेल्या बेदम मारहाणीनंतर गोव्याचे माजी आमदार लवू सूर्याजी मामलेदार ( EX-MLA LavooSuryaji Maweledar) (68) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (ता. 15) दुपारी बेळगावातील खडे बाजार परिसरात ही घटना घडली.

लवू मामलेदार यांचे बेळगावात (Belgaum) नेहमी येणे-जाणे होते. ते नेहमी खडे बाजार परिसरातील श्रीनिवास लॉजमध्ये उतरत. यावेळीही त्यांनी याच लॉजमध्ये खोल्या आरक्षित केल्या होत्या. मात्र, शनिवारी त्यांच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच त्यांची मुलगी अक्षता मामलेदार ही सायंकाळी नातेवाईकांसह बेळगावात दाखल झाली. वडिलांचे पार्थिव पाहून अक्षता हिला अश्रू आवरले नाहीत. तिने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Lavoo Mamledar
Sanjay Raut : चेंगराचेंगरीत 150 प्रवाशांचा मृत्यू तर कुंभमेळ्यातून 7 हजार लोक बेपत्ता; राऊतांचा खळबळजनक दावा

असा झाला मामलेदारांवर हल्ला

या घटनेविषयी माहिती देताना श्रीनिवास लॉजचे कर्मचारी अडिवेप्पा करलिंगन्नावर म्हणाले की, लवू मामलेदार हे आमच्या लॉजचे नियमित ग्राहक होते. मामलेदार आले, त्यांच्या पाठोपाठ कॅबचालक लगेच आला अन् त्यांना मारहाण केली. आम्ही मामलेदार यांना त्याच्या तावडीतून सोडविले.

कॅब चालकाला सांगूनही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर त्याला अडवून आम्ही मामलेदार साहेबांना लॉजमधील रूमकडे पाठविले. पण रिसेप्शन काऊंटरसमोरच ते कोसळले. लॉज मालकांच्या कारमधून आम्ही त्यांना रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Lavoo Mamledar
Mahayuti Politics : CM फडणवीसांच्या 'त्या' निर्णयाचा एकनाथ शिंदेंचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह 'या' आमदारांना फटका

खुनाचा गुन्हा दाखल रिक्षाचालकास अटक

या प्रकरणी रिक्षाचालक तथा टॅक्सी कॅबचालक मुजाहीद शफी सनदी (25.रा. सुभाषनगर) याच्यावर मार्केट पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली असून, त्याची ऑटो पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे.

निःस्वार्थी सेवा संस्मरणीय; मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी लवू मामलेदार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, पोलिस अधिकारी आणि नंतर आमदार म्हणून त्यांनी राज्याची केलेली निःस्वार्थ सेवा स्मरणात राहील. राज्य प्रशासन बेळगावमधील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून या घटनेची सखोल चौकशी करत आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. दिवंगत आत्म्यास सदगती लाभो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com