अखेर केंद्रीय मंत्र्यांनी विरोधी पक्षातील भावाला फोडत भाजपमध्ये आणलंच!

दोघे अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांमध्ये होते.
Devendra Singh Rana Joins BJP.
Devendra Singh Rana Joins BJP.
Published on
Updated on

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पहिला धक्का माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला यांना बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्समधील दोन बड्या नेते सोमवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक नेता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांचा लहान भाऊ आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू प्रांताचे अध्यक्ष असलेले देवेंद्र सिंह राणा व माजी मंत्री सुरजित सिंह सलाथिया यांनी रविवारीच पक्षाचा राजीनामा दिला होता. दोघांनीही नवी दिल्लीमध्ये सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी राणा हे केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे लहान बंधू आहेत.

Devendra Singh Rana Joins BJP.
भाजपला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याचा आमदार मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश

राणा व जितेंद्र सिंह हे अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांमध्ये होते. राणा हे अब्दुल्ला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. ते आमदारही राहिले आहेत. पण जम्मू व काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर राणा यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी त्याचे समर्थन केले होते. तर अब्दुल्ला यांचा त्याला विरोध होता. त्यानंतर जितेंद्र सिंह यांनी राणा यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांना यात यश मिळाले आहे.

दरम्यान, राणा हे अब्दुल्ला यांच्या पक्षातील बडा हिंदू चेहरा होते. तसेच पक्षाच्या काही बड्या नेत्यांपैकी ते एक होते. ओमर अब्दुला यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव होते. मागील काही दिवसांपासून राणा यांनी पक्षातून बाहेर पडण्याबाबत चर्चा होती. त्यांनी मागील आठवड्यात बुधवारी पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुला व उपाध्यक्ष ओमर अब्दुला यांची भेटही घेतली होती. सुमारे दोन तास त्यांच्या बैठक चालली होती. या बैठकीत विविध मुद्यांसह त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली होती.

या भेटीनंतर राणा म्हणाले होते की, जम्मूच्या हिताशी समझोता केला जाणार नाही. जम्मूतील लोक विकास, रोजगार, सुशासन आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समान अधिकार मागत आहेत. त्यासाठी झुकता कामा नये. जम्मूच्या हिताला सतत कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता लोकांना शांतीपूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला संकल्प केला आहे.

जम्मूच्या हिताशी समझोता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे आता काहीही परिणाम होवोत. जम्मूकडं दुर्लक्ष करणे म्हणजे स्वाभिमानी लोकांना अपमान करण्यासारखे आहे. ते लोक अनेक वर्षांपासून सोबत आहेत. आम्ही विविधतेत एकता व जम्मू-काश्मीरचे राजकीय वाहक आहोत. या भावनेत कोणीच अडथळे आणू शकत नाही, असंही राणा म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com