Goa BJP : अखेर भाजपने गोव्यात भाकरी फिरवली! 'या' माजी आमदाराची प्रदेशाध्यक्षपदी निवड

Goa BJP President : माजी आमदार दामू नाईक यांची गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 'गेल्या दोन दिवसांत असंख्य कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवर साधलेला संपर्क आणि दामू प्रदेशाध्यक्ष म्हणजे आपणच प्रदेशाध्यक्ष झालो', अशी व्यक्त केलेली भावना हीच कामाची खरी मोठी पावती असल्याचे मनोगत व्यक्त केले.
Damu Naik, Pramod Sawant
Damu Naik, Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

Panaji News, 19 Jan : माजी आमदार दामू नाईक (Damu Naik) यांची गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 'गेल्या दोन दिवसांत असंख्य कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवर साधलेला संपर्क आणि दामू प्रदेशाध्यक्ष म्हणजे आपणच प्रदेशाध्यक्ष झालो', अशी व्यक्त केलेली भावना हीच कामाची खरी मोठी पावती असल्याचे मनोगत व्यक्त करत नाईक यांनी शनिवारी (18 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

गोमंतक मराठी समाज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि मावळते प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दामू यांना भाजप कार्यालयातील प्रदेशाध्यक्षांच्या कक्षात नेत स्थानापन्न केले. निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी दामू यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

Damu Naik, Pramod Sawant
Saif Ali Khan : अखेर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

यावेळी मंचावर मुख्यमंत्री, तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा, आमदार डॉ. दिव्या राणे, दिगंबर कामत, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर, रूडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर.

माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे, उत्तर गोवा (Goa) जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर आणि मान्यवर उपस्थित होते. सूत्रनिवेदन माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले, तर प्रेमानंद म्हांबरे यांनी आभार मानले.

Damu Naik, Pramod Sawant
Dhananjay Munde : बीडचं पालकमंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट; म्हणाले, '…याचा मला आनंद वाटतो!'

कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सभागृहात पाय ठेवण्यास जागा नव्हती आणि त्यापेक्षा दुप्पट कार्यकर्ते सभागृहाबाहेर होते. इमारतीच्या गच्चीवर बसून कार्यक्रम बघण्याची-ऐकण्याची व्यवस्था करूनही ती अपुरी पडली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते इमारतीत मिळेल त्या ठिकाणी उभे राहिले. अनेकांना इमारतीबाहेर उभे राहावे लागले. कार्यकर्त्यांची गर्दी एवढी होती की, कार्यक्रम संपल्यावर दोनेक तास दामू यांना मंचावरच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com