Saif Ali Khan : अखेर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saif Ali Khan Accused Arrest : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आला मुंबई पोलिसांना मोठं यश आलं आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद अलियान असं आहे.
Saif Ali Khan Accused Arrest
Saif Ali Khan Accused ArrestSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 Jan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात आला मुंबई पोलिसांना मोठं यश आलं आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील उच्चभ्रू अशा हिरानंदानी इस्टेटला लगतच्या लेबर कॅम्पमधून पोलिसांनी मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर याला अटक केली आहे.

आरोपीचे नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर असं आहे. मात्र, हल्ल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्याने सुरुवातीला पोलिसांना आपलं नाव विजय दास असल्याचे सांगितलं. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

Saif Ali Khan Accused Arrest
Dhananjay Munde : बीडचं पालकमंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट; म्हणाले, '…याचा मला आनंद वाटतो!'

मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर याला रविवारी (ता.19) सकाळी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. हल्लेखोर हा भारतीय आहे की बनावट ओळखपत्र घेऊन भारतात राहणारा बांगलादेशी नागरिक आहे याचाही तपास पोलिस (Mumbai Police) करत आहेत. दरम्यान, सैफवरील हल्ल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं.

मुंबईतील हाय प्रोफाईल व्यक्तीवर अशाप्रकारे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य माणसांच्या सुरक्षा तर वाऱ्यावरच असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफवरील हल्ला प्रकरण चांगलंच उचलून धरलं होत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com