G-20 Summit : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांना G-20 च्या डिनरचे निमंत्रण

Delhi News : G-20 शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानीत G-20 शिखर परिषद होणार आहे.
G-20 Summit :
G-20 Summit : Sarkarnama

Delhi G-20 Summit 2023 : G-20 शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानीत G-20 शिखर परिषद होणार आहे. त्यासाठी संपूर्ण राजधानीची भव्य सजावट करण्यात आली आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील मान्यवर दिल्लीत दाखल होत आहेत. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळ, परदेशी प्रतिनिधी, खासदार आणि मंत्री यांच्याशिवाय देशातील काही माजी ज्येष्ठ नेते G-20 डिनरमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे,या डिनरसाठी दोन माजी पंतप्रधानांनाही डिनरचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांना आमंत्रण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच.डी. देवेगौडा यांनाही G-20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते डिनरला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे प्रमुख नेते जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत.

G-20 Summit :
Mamata Banerjee News : आमदारांच्या पगारात भरघोस वाढ ; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

भारताकडे G-20 चे यजमानपद

विशेष म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. मात्र,या शिखर परिषदेत चीनचे प्रतिनिधित्व चीनचे पंतप्रधान ली केकियांग करणार आहेत, तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे रशियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.भारताने पहिल्यांदाच G-20 परिषदेचे आयोजन केले आहे. भारताची परंपरा आणि ताकद दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.

पाहुण्यांची दिल्ली पोहोचण्यास सुरुवात

G-20 शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या देशांमध्ये नायजेरिया, अर्जेंटिना, इटली, AU (कोमोरोसचे प्रतिनिधित्व) आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. बांगलादेश, युनायटेड किंगडम, जपान सौदी अरेबिया, कोरिया प्रजासत्ताक, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, चीन, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, इंडोनेशिया, तुर्की स्पेन, जर्मनी, फ्रान्स, मेक्सिको, युरोपियन युनियन, सिंगापूर या देशांतील प्रतिनिधीही G20 परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषद समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पाहुणे दिल्लीत दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही जो बायडेन आज संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास ते दिल्लीला पोहोचतील.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com