मोठी घडामोड : संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना अटक

शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे.
Sandesh Sawant and Narayan Rane
Sandesh Sawant and Narayan Rane Sarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) हे आज शरण आले. त्यांना अटक करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, याच गुन्ह्यात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली आहे. (Nitesh Rane Updates)

संदेश सावंत हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालायासमोर शरण झाले. त्यानंतर त्यांना अटक करून कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सावंत यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्याकडे अजून तपास करायचा आहे, असे म्हणणे घरत यांनी मांडले. यावर न्यायालयाने त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर 10 फेब्रुवारीला नितेश राणेंना रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला होता.

Sandesh Sawant and Narayan Rane
निवडणुकाच अवैध ठरवा! पराभव समोर दिसू लागताच भाजपची उच्च न्यायालयात धाव

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)

Sandesh Sawant and Narayan Rane
विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींचा विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com