Donald Trump Surrender : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; काय आहे नेमकं प्रकरण?

Trump MugShot : इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा आरोपी म्हणून फोटो काढण्यात आला आहे
Donald Trump Surrender :
Donald Trump Surrender : Sarkarnama

New Delhi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक घोटाळ्याप्रकरणी अटलांटा येथील फुल्टन काउंटी तुरुंगात आत्मसमर्पण केले. निवडणुकी दरम्यान अफरातफर केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी आटलांटाच्या फुल्टन कोउंटी तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलून फसवणूक करणे, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. पण आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांतच त्यांना जामीनही मंजूर झाला.

दरम्यान, ट्रम्प यांना अटक झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात मोठी गर्दी झाली होती. २०२० मध्ये जॉर्जियात राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल बदलण्याचे षडयंत्र रचल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप होता. या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी शरणागती पत्करली. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्पने यांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Donald Trump Surrender :
Disqualification of 16 MLAs : प्रत्येक आमदाराचे सहा हजार पानांचे उत्तर, आमचाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा केला दावा !

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, 'मी काहीही चूक केली नाही, असं सांगत ट्रम्प यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली दरम्यान, जॉर्जियामधील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवून लावण्यासाठी ट्रम्प यांच्यावर फसवणूक, घोटाळेबाजी आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करण्यात आले होते. तसेच या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले होते. (America Political News)

विशेष म्हणजे, ट्रम्प 2 वर्षांनंतर ट्विटरवर परतले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना ट्विटरवर बंदी घालण्यात आली होती. तीही हटवण्यात आली आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवरील वापसीचे स्क्रिनशॉटही शेअर केले. तसेच, ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनीही ट्रम्प यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

Donald Trump Surrender :
Ajit Pawar Sabha News : बीडचा विकास बारामतीसारखा करणार का ? सभेआधीच बॅनरने केली अजितदादांची कोंडी..

काय आहे जॉर्जिया क्रिमिनल केस ?

2020 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर ट्रम्प यांच्यावर निकाल उलटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. 2 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प आणि जॉर्जियाचे निवडणूक अधिकारी ब्रॅड रॅफेनस्परगर यांच्यात सुमारे तासभर फोनवर चर्चा झाली. 3 जानेवारी रोजी दुपारी 2:41 वाजता व्हाईट हाऊसच्या कार्यालयातून हा कॉल करण्यात आला होता. (Donald Trump)

ट्रम्प यांनी फोनवर रॅफेनस्परगरला सांगितले की त्यांनी मतांची पुनर्मोजणी करावी जेणेकरून राज्याची 16 इलेक्टोरल मते त्यांच्याकडे गेली. या बाबतचे कॉल रेकॉर्डिंग सर्वात प्रथम वॉशिंग्टन पोस्टने प्रकाशित केले होते. मला फक्त 11,780 मते हवी आहेत, असे ट्रम्प फोनवर म्हणाले होते. इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी रॅफेनस्परगरचे ऐकले नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com