Ajit Pawar Sabha News : बीडचा विकास बारामतीसारखा करणार का ? सभेआधीच बॅनरने केली अजितदादांची कोंडी..

Marathwada Political News : बाजार समितीत अपक्ष निवडून आलेल्या गुंदेकर यांच्या या बॅनरची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar Sabha News
Ajit Pawar Sabha News Sarkarnama

Beed Political News : बीडमध्ये २७ रोजी होणारी अजित पवार यांची उत्तर सभा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. बॅनरबाजी आणि टीजरमुळे या सभेची चर्चा सुरू असतांना आता बीडमध्ये लागलेल्या एका बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (NCP Leader Ajit Pawar News) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची ही उत्तर सभा प्रतिष्ठेची केली असून संपुर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. शरद पवार यांच्या स्वाभीमान सभेनंतर अजित पवारांच्या सभेकडे लक्ष लागलेले असतांना सभेआधीच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाने बॅनरबाजीच्या माध्यमातून केला आहे.

Ajit Pawar Sabha News
Uddhav Thackeray Sabha News : ठाकरेंच्या `निर्धार` सभेचा बोलबाला, प्रोमोतून निष्ठावंतांना साद..

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजित पवारांची सभा ही कुणाला उत्तर देण्यासाठी नाही, तर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी असल्याचे जाहीर केले होते. (Beed News) या पार्श्वभूमीवर धनंजय कुंदेकर यांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर अजित पवारांना पाच प्रश्नांच्या माध्यमातून जाब विचारणारे बॅनर सध्या चर्चेत आले आहे. विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी अजित पवारांची सभा असल्याचे जाहीर करणाऱ्या मुंडे यांना याच मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून होतांना दिसतोय.

`बीडच्या रस्त्यामधील खड्डे बारामतीसारखे चकचकीत केव्हा होणार, बीड जिल्हा बारामतीसारखा समृद्ध कधी होणार? यासह पाच प्रश्न जिल्ह्याच्या संदर्भात उपस्थितीत केले आहे. २७ रोजीच्या सभेत आपण या प्रश्नांची उत्तरे द्याल, अशी अपेक्षा देखील या बॅनरच्या माध्यमातून धनंजय गुंदेकर यांनी (Ajit Pawar) अजित पवारांकडून व्यक्त केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत अपक्ष निवडून आलेले गुंदेकर हे संचालक असून त्यांच्या या बॅनरची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

या शिवाय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० चा पीक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार? गेल्या वर्षीच्या अनुदानाचे वाटप कधी करणार? कामगारांना प्रमाणपत्र आणि त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार? असे पाच प्रश्न या बॅनरवर उपस्थितीत करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांच्यावरही गुंदेकर यांनी निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. आता अजित पवार येण्याआधी विकासावर बोलत आहेत. अजितदादा आपण माझ्या पाच प्रश्नांची उत्तरे २७ तारखेच्या सभेत द्याल, अशी अपेक्षा आहे. संचालक होईपर्यंतच्या प्रवासात मी एकही बॅनर लावले नाही, मात्र स्वतःच्या कमाईतून अधिकृत बॅनरद्वारे हे प्रश्न बीडच्या शेतकरी, कामगारांच्या वतीने उपस्थित करतोय, असेही धनंजय गुंदेकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com