लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात युरिन इन्फेक्शनमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
युरिन इन्फेक्शनमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. डॉ. नरेश त्रेहन स्वतः ८२ वर्षांचे मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि साखर सिंह यादव यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. पाच भावंडांपैकी मुलायम सिंह हे रतन सिंह हे दूसरे अपत्य होते. राजकारणात येण्यापूर्वी मुलायम सिंह यादव यांना आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए) आणि बीटी केल्यानंतर इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. पण सक्रिय राजकारणात असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
मुलायम सिंह यांनी ते 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 या तीन अल्प कालावधीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ते वडील आहेत. ते सध्या आझमगड मतदारसंघाचे खासदार आहेत. 1996-1998 पर्यंत त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले.
1974-2007 दरम्यान सात वेळा ते उत्तर प्रदेशचे आमदार म्हणून निवडून आले. मुलायम सिंह यांनी 1992 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पक्षाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेईपर्यंत त्यांनी विविध राजकीय पक्षांशी युती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक वेळा विजय मिळवला. सध्या ते सहाव्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून काम पाहत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.