दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय दौरा जाहीर करण्यात आला आहे. ते तीन दिवसी आपले गृहराज्य असलेल्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते तब्बल १४५०० कोटी मूल्य असलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. जवळ येऊन ठेपलेल्या गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे विविध अंगांनी पाहिले जात आहे. यावर आता चर्चाही घडून येत आहेत.
९ ऑक्टोबरच्या दिवशी सायंकळी ५ वाजता मोदींच्या हस्ते गुजरातेतल्या मेहसाणातील मोढेरा या ठिकाणी अनेक प्रकल्पांचे उद्धाटन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० ऑक्टोबरला, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोदी भरूच भागातील आमोद या ठिकाणी काही प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथील मोदी शैक्षणिक संकुलाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जामनगर येथील आणखी काही प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहेत.
दरम्यान ११ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदी अहमदाबादला असरवा या ठिकाणी रुग्णालय भूमीपूजन करणार आहेत. यानंतर मोदी उज्जैन तीर्थक्षेत्राला मार्गस्थ होणार आहेत. तेथे ते श्री महाकालेश्वर मंदिरात पूजा करतील. तर याच दिवशी सायंकाळी ६ वाजता श्री महाकाल लोक येथील कार्यक्रमात मोदी सहभाग होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.