पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री दोन तासातच नाकारला पद्मभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Buddhadev Bhattacharya
Buddhadev Bhattacharyasarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी केंद्र सरकारने (Central Government) दिलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासात पुरस्कार नाकारला आहे. भट्टाचार्जी आणि पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय (एम) ने म्हटले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे भट्टाचार्जी हे २००२ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ''मला पद्मभूषण पुरस्काराबद्दल काहीही माहिती नाही, मला कोणीही त्याबद्दल सांगितले नाही. मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला असला तरी मी तो नाकारत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Buddhadev Bhattacharya
पवार- पूनावाला असाही योगायोग : एकाच बॅचच्या दोन काॅलेजमित्रांना पद्मपुरस्कार

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार -

जेष्ठ गायिका प्रभा आत्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

Buddhadev Bhattacharya
मित्रा, तुझा अभिमान वाटतो : शरद पवार यांनी केले अभिनंदन

पद्मभूषण पुरस्कार -

१. गुलाम नबी आझाद, २. व्हीक्टर बॅनर्जी, ३. गुरमित बावा (मरणोत्तर), ४. बुद्धदेव भट्टाचार्य, ५. नटराजन चंद्रशेखरन, ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला, ७. मधुर जेफरी, ८. देवेंद्र झांजरीया, ९. राशीद खान, १०. राजीव मेहेरश्री, ११. सुंदरंजन पिचाई, १२. सायरस पुनावाला, १३. संजया राजाराम (मरणोत्तर), १४. प्रतिभा रे, १५. स्वामी सच्चिदानंद, १६. वशिष्ठ त्रिपाठी

पद्मश्री पुरस्कार -

तर एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सन्मान होणार आहे. यात डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), हिंमतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com