Jyotiraditya Shinde twitter: मोदी मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याच्या ट्विटर हँडलवर भाजपचा उल्लेख नाही. जे भाजप नेते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांच्या ट्विटर बायोमध्ये फक्त केंद्रीय मंत्री असे लिहिले आहे. (From Shah to Shinde.. No union minister's Twitter bio mentions 'BJP'? What is the reason?)
शनिवारी (20 मे) केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटर बायोबाबत अचानक चर्चा सुरू झाली, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपचा (BJP) उल्लेख काढून टाकल्याचा चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून भाजप हटवल्याचा दावा भारतीय युवक काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटने केला. यानंतर सिंधिया यांच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा ही सुरू झाल्या होत्या.
पण, या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नव्हते, कारण केवळ शिंदे यांच्याशिवाय मोदी सरकारच्या कोणत्याही मंत्र्याच्या ट्विटर बायोमध्ये भाजपचा उल्लेख नाही. विशेष बाब म्हणजे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्याही ट्विटर बायोमध्ये भाजप चा उल्लेख दिसत नाही.
भाजपच्या सर्व मंत्र्यांचे ट्विटर पेज तपासले असता कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटर बायोमध्ये भाजपचा उल्लेख करण्यात आलेला नाही. सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये फक्त केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाचे नाव लिहिले आहे. काही मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख केला आहे, मात्र पक्षाचा उल्लेख कोणाच्याही प्रोफाईलमध्ये दिसत नाही. मात्र, मंत्री बनलेल्या एनडीएमधील भाजपच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये त्यांच्या राजकीय पक्षाचा उल्लेख केला आहे. (BJP Politics)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.