New Delhi News : राजधानी नवी दिल्लीत शनिवारपासून ९ व १० सप्टेंबरला G20 शिखर परिषद होत आहे. परिषदेच्या निमित्ताने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरूपही आले आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
G20 परिषद प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे होणार आहे. व्हीआयपी ज्या मार्गाने जाणार त्या मार्गांवर सर्वसामान्य नागरिकांना बंदी असणार आहे. त्यासोबतच वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.
राजधानी दिल्लीत परिषदेच्या निमित्ताने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राजधानी दिल्लीत ५० हजार पोलिस तैनात असणार आहेत. त्यासोबतच इतर स्पेशल फोर्सदेखील तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी, सीआरपीएफ, आईबी आणि रॉ पासून ब्रिटेनची एमआई 6, रशियाची केजीबी, अमेरिकेची सीआईए आणि इजरायलच्या मोसादसारख्या जागतिक गुप्तचर यंत्रणांचीही भारतातील G20 परिषदेवर नजर असणार आहे.
त्यासोबतच प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी ४० हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी फेस रेकगनिशन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. सायबर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. (G20 Summit) पुढचे ४८ तास राजधानी दिल्लीत ५० हजार पोलिस तैनात असणार आहेत. त्यासोबतच इतर स्पेशल फोर्सदेखील तैनात करण्यात आली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.