Democratic Progressive Azad Party : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक प्रोगेसिव आझाद पार्टीला(डीपीएपी) पुन्हा एकदा झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या दहा पैकी चार उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
विशेष म्हणजे नाव मागे घेणारे उमेदवार हे आझाद(Ghulam Nabi Azad) यांचा बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या, डोडा, रामबन आणि किश्तवाड भागातील आहेत. या भागात आता केवळ अब्दुल मजीद वानी हेच डोडा विधानसभा क्षेत्रात आझाद यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या आधी गुलाम नबी आझाद यांनी प्रकृती खराब असल्याचे सांगत, विधानसभा निवडणुकीच्या(Vidhan Sabha Election) प्रचारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. याचसोबत त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय उमेदवारांवर सोपवला होता.
आझाद यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते की, आझाद यांची 25 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा श्रीनग येथे तब्येत बिघडली होती. यानंतर उपचारांसाठी ते नवी दिल्लीला रवाना झाले आणि तिथे दोन दिवस रुग्णालयात होते. आता सध्या ते आराम करत आहेत.
जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir) विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली आहे. याचबरोबर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी केलेली आहे. असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुलाम नबी आझाद यांना मोठा झटका बसला आहे.
जम्मू-काश्मीरमधील एकूण ९० विधानसभा मतदारसंघांसाठी तीन टप्प्यात मतदान होईल. पहिला टप्पा १८ सप्टेंबर, दुसरा टप्पा २५ सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्याती मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल असणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.