Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काँग्रेस अन् नॅशनल कॉन्फरन्सचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं!

Congress and National Conference Alliance : जाणून घ्या, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार आणि फारुख अब्दुल्ला यांनी काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi, Omar Abdullah
Rahul Gandhi, Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

Jammu and Kashmir Vidhan Sabha Eletion : जम्मू-काश्मीर विधनसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. जागा वाटपावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर तर काँग्रेस 32 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

याशिवाय सीपीआयएम आणि पँथर्ससाठी एक-एक जागा आघाडीकडून सोडण्यात आली आहे. तर पाच जागांवर दोन्ही पक्षांनी मैत्रिपूर्ण लढतीची तयारी दर्शवली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला(Farooq Abdullah) यांनी म्हटले की, ही खूप आनंदाची गोष्ट आहे की, आम्ही दोघेही(काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स) त्या शक्तींविरोधात लढत आहोत, ज्या येथील लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत.

इंडिया आघाडी यासाठीच बनण्यात आली होती, जेणेकरून आम्ही त्या शक्तींशी लढू शकू, ज्यांना जातीय तेढ निर्माण करायीच आहे. आज ही आनंदाची गोष्ट आहे की आम्ही चर्चा पूर्ण केली आहे आणि समन्वयाने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकजुटीने निवडणूक लढवू.

Rahul Gandhi, Omar Abdullah
BJP Star Campaigner List : जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी भाजपची 40 'स्टार' प्रचारकांची यादी जाहीर!

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांचीही घोषणा यादी प्रसिद्ध करून करत आहे. याच दरम्यान आज भाजपने(BJP) आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय आता भाजपने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे.

Rahul Gandhi, Omar Abdullah
Assembly Election 2024 : काश्मीरमध्ये भाजपची वाट खडतर; राहुल गांधींनी थेट अब्दुल्लांचे घर गाठत घेतला मोठा निर्णय...

ही निवडणूक तीन टप्प्यांत होणार आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे 24, 26 आणि 40 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखा 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com